ठाणे : भिवंडी शहरात गेल्याकाही वर्षांपासून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) ठाणे- भिवंडी-कल्याण या मेट्रो निर्माणाची कामे सुरू आहेत. तसेच रस्त्याकडेला असलेल्या गटारांची साफ-सफाई झालेली नाही. त्याचा परिणाम भिवंडी शहरात बसला. भिवंडी शहरात मुख्य मार्ग तुंबले. शहरातील कशेळी-काल्हेर भागातील मुख्य रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने येथील रहिवाशांचे हाल झाले आहेत. नागरिकांना या साचलेल्या पाण्यातून पायपीट करत जावे  लागले. तर, अनेक दुचाकी या पाण्यामध्ये बंद पडल्या होत्या. त्यामुळे अपघाताची भितीही व्यक्त केली जात आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा <<< ठाणे : संततधार पावसामुळे उल्हास नदी इशारा पातळीजवळ; नागरिकांना सतर्कतेचा ईशारा

हेही वाचा <<< कल्याण, डोंबिवलीतील रस्ते पाण्याखाली; टिटवाळा येथील काळू नदीवरील रुंदे पूल पाण्याखाली

भिवंडी शहर हे गोदामांचे शहर म्हणून ओळखले जाते. दररोज हजारो अवजड वाहने भिवंडी शहरातून वाहतूक करत असतात. तसेच भिवंडीतील कशेळी काल्हेर या भागातही रहिवासी क्षेत्र मोठ्याप्रमाणात वाढले आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या सोयीसाठी एमएमआरडीएकडून ठाणे- भिवंडी- कल्याण या मेट्रो निर्माणाचे काम कशेळी -काल्हेर मार्गावर सुरू आहे. मेट्रोच्या कामांमुळे येथील रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून मोठ्याप्रमाणात खड्डे पडल्याचे येथील नागरिक सांगत आहेत. त्यातच शुक्रवारी सकाळी भिवंडीत मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे या भागातील काल्हेर, कशेळी भागातील प्रमुख रस्त्यावर मोठ्याप्रमाणात पाणी साचले. या भागातील रस्त्याकडेला असलेल्या सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारांची साफ-सफाई झालेली नाही. त्यामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यास जागा शिल्लक नाही. त्यामुळे या भागात गुडघाभर पाणी साचले. याप्रकारामुळे येथील नागरिकांचे हाल झाले. या पाण्यात अनेक दुचाकी बंद पडत होत्या. पाण्यामुळे खड्डे दिसत नसल्याने जीव मुठीत घेऊन नागरिकांना ये-जा करावी लागत होती.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane bhiwandi collapsed continuous rain deep water road kasheli area bhiwandi ysh
First published on: 16-09-2022 at 17:01 IST