Thane Dahi Handi 2025 Celebration : ठाणे : दहीहंडी निमित्ताने ठाण्यात ठिकठिकाणी वाहतुक बदल लागू केले. त्याचा परिणाम शहरातील वाहतुक व्यवस्थेवर झाला. ठाण्यातील कॅडबरी जंक्शन, माजिवडा, मुंबई नाशिक महामार्गावर वाहतुक कोंडी झाली होती.

ठाणे शहरात दहीहंडीचे आयोजन केल्याने मुख्य तसेच अंतर्गत मार्गावर अनेक ठिकाणी ठाणे वाहतुक पोलिसांनी वाहतुक बदल लागू केले. गोविंदा पथकांची वाहने, रस्त्यावर वाहनांचा भार वाढल्याने शनिवारी पूर्व द्रुतगती महामार्गावर कॅडबरी जंक्शन ते साकेत पूल आणि कापूरबावडी पर्यंत वाहतुक कोंडी झाली होती. या वाहतुक कोंडीमुळे घोडबंदर येथून ठाण्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या चालकांचे हाल झाले. वसंत विहार, मानपाडा भागातही अनेक ठिकाणी कोंडी झाली होती.