लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे: संयुक्त राष्ट्र संघाने यंदाचे वर्ष हे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले असून या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात ‘ठाणे ईट राईट मिलेट मेळावा आणि वाॅकथाॅन’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमातून सुरक्षित अन्न व पौष्टिक अन्नविषयक आणि भरड धान्याचा आहारात समावेश करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.

ठाणे येथील गावदेवी मैदानात २९ एप्रिल रोजी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण, ठाणे महापालिका आणि न्युट्रीलाईट व असोचेम यांच्या संयुक्त विद्यामाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थिती लावणार आहेत. या उपक्रमात खाद्यपदार्थाच्या स्टॉलसची रेलचेल असणार आहे तसेच वॉकथॉनच्या माध्यमातून सुरक्षित व पौष्टीक अन्नविषयक जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती अन्न सुरक्षा आणि प्रमाणीकरण प्राधिकरणाच्या अधिकारी प्रिती चौधरी यांनी दिली.

हेही वाचा… कल्याणच्या स्टेट बँकेत महिलेची दीड लाखांची फसवणूक

या मेळाव्याची सुरुवात पहाटे ६ वाजता योगा व झुंबा या उपक्रमाने होणार आहे. त्यानंतर वॉकॅथॉन व तलाव पाली येथे स्ट्रीट फूड हबचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यात ३० हून अधिक स्टाॅल असणार आहेत. सायंकाळी ४.३० वाजता भरड धान्य मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. यानंतर चित्रकला, पोस्टर मेकिंग, रांगोळी प्रश्न मंजुषा, भरडधान्य आधारित पाककृती अशा स्पर्धा घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा समारोप सोहळा सायंकाळी ठीक ६ ते ८ वाजता होणार आहे. यात सांस्कृतिक कार्यक्रम, विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane eat right millet get together has been organized in thane city dvr
First published on: 25-04-2023 at 18:15 IST