ठाणे : ठाणे जिल्ह्यामध्ये ९० च्या दशकात ठाणे शहरांपासून ते थेट वाडा मोखाड्याच्या पाड्यापर्यंत शिवेसना पोहोचवण्याचे काम करणारे दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे २३ वर्षांपूर्वी निधन झाले. पण, ते हयातीत असतानाही त्यांचा मोठा चाहता वर्ग होता आणि तो निधनानंतरही कायम असल्याचे चित्र सातत्याने दिसून येते. शिवसेनेत दोन गट पडले पण, दोन्ही गटातील नेते आणि शिवसैनिक मात्र दिघेंना गुरुस्थानी मानतात. गुरुपौर्णिमेनिमित्ताने हे पुन्हा दिसून आले असून दिघेंना वंदन करणाऱ्या पोस्ट गुरुवारी समाजमाध्यमांवर सकाळपासून झळकू लागल्या आहेत.
आनंद चिंतामणी दिघे असे त्यांचे पूर्ण नाव होते. त्यांचा जन्म २७ जानेवारी १९५२ रोजी झाला. त्यांनी शिवसेनेचे ठाणे…ठाण्याची शिवसेना हे सूत्र पक्क करण्यासाठी अगदी तळागाळापर्यंतच्या पोहचवण्याचे काम केले. जिल्ह्यामध्ये ९० च्या दशकात ठाणे शहरांपासून ते थेट वाडा मोखाड्याच्या पाड्यापर्यंत शिवेसना पोहोचवण्याचे काम त्यांनी केले. याच दशकात शिवसेना म्हणजे ठाणे आणि ठाणे म्हणजे आनंद दिघे असे जणू समिकरणच तयार झाले होते. यातूनच ‘शिवसेनेचा बालेकिल्ला…आनंद दिघेंचा ठाणे जिल्हा’ अशी घोषणा उदयास आली होती.
ठाण्यातील सर्वात गजबजाटलेला परिसर म्हणून ओळख असणाऱ्या टेंभी नाका परिसरामध्ये त्यांचे घर होते. त्यालाच त्यांनी आनंद आश्रम बनविले होते. याठिकाणी विविध कामांसाठी आणि न्यायासाठी नागरिक रात्री अपरात्री सुद्धा यायचे. त्यांच्या आश्रमाचे दरवाजे २४ तास खुले असायचे. ठाणे जिल्ह्यातील शिवसैनिक त्यांचे कुटुंब होते आणि शिवसैनिकांमध्ये त्यांच्याविषयी आदरयुक्त भीती होती. २६ ऑगस्ट २००१ रोजी त्यांचे निधन झाले. पण, त्यांच्या नावाचा करिष्मा आजही कायम असल्याचे निवडणुकीत दिसून येते.
आनंद दिघे यांच्या जयंती, पुण्यतिथी आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांच्या नावाची चर्चा ठाण्यात होते आणि आजही ती कायम आहे. आनंद दिघे यांचे २३ वर्षांपूर्वी निधन झाले. पण, ते हयातीत असतानाही त्यांचा मोठा चाहता वर्ग होता आणि तो निधनानंतरही कायम असल्याचे चित्र सातत्याने दिसून येते. शिवसेनेत दोन गट पडले पण, दोन्ही गटातील नेते आणि शिवसैनिक मात्र दिघेंना गुरुस्थानी मानतात. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर अशोक वैती, शिवसेना (ठाकरे गट) नेते राजन विचारे असे अनेक नेते त्यांचे शिष्य आहेत. यासह शिवसैनिक सुद्धा त्यांना गुरुस्थानी मानतात. गुरुपौर्णिमेनिमित्ताने हे पुन्हा दिसून आले असून दिघेंना वंदन करणाऱ्या पोस्ट गुरुवारी समाजमध्यमांवर सकाळपासून झळकू लागल्या आहेत.
एकनाथ शिंदे यांची पोस्ट
आपणांसारिखे करिती तात्काळ | नाही काळवेळ तयालागी ||
लोहपरिसाची न साहे उपमा | सदगुरु महिमा असा हा अगाध ||, असा उल्लेख करत वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या चरणी साष्टांग दंडवत…! अशी पोस्ट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समजमाध्यमांवर केली आहे.
आनंद दिघे यांचे शिष्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार राजन विचारे हे नेहमी एकत्रित संघटनेचे काम करताना दिसायचे. एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर राजन विचारे त्यांच्या सोबत जातील असे सांगितले जात होते. परंतु ते उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहिले. शिवसेनेत दोन गट पडले पण, दोन्ही गटातील नेते आणि शिवसैनिक हे आनंद दिघे यांना गुरुस्थानी मानताना दिसून येतात.