मध्यम वयोगटातील उमेदवारांची संख्या अधिक

ठाणे महानगरपालिका निवडणुकीत तरुण तडफदार नेत्यांची संख्या वाढलेली दिसत आहे. विशेष म्हणजे हिंदी सिनेमासृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिच्या नावाशी साधम्र्य असलेल्या २१ वर्षीय तरुणीला मनसेने यंदा उमेदवारी दिली आहे. २० ते ३० या वयोगटातील दहा उमेदवारांना भाजपने उमेदवारी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसनेचौघांना तर काँग्रेसने १२ तरुणांना संधी दिली आहे. शिवसेनेने १५ तरुणांवर विश्वास टाकला आहे. २५ तरुण अपक्ष म्हणून स्वत:ला अजमावत आहेत. मध्यम वयोगटातील उमेदवारांची संख्याही लक्षणीय आहे. ३० ते ६० या वयोगटात साधारणत: सर्व पक्ष मिळून ७१९ उमेदवार नशीब आजमावित आहेत. ६०-७० वयोगटातील १२ उमेदवार आहेत.प्रत्येक पक्षाने अधिक वयाच्या उमेदवारांना संधी देण्याऐवजी तरुणांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली होती.

शिवसेनेत पुत्रप्रेम

शिवसेनेने प्रस्थापित नेत्यांच्या मुलांना यंदा संधी दिली आहे. त्यात पूर्वेश सरनाईक, सुमीत भोईर आदींचा समावेश आहे. तरुण तुर्काबरोबरच ७६ वर्षांचे दोन उमेदवारही निवडणूक रिंगणात आहेत.

tv09