शहरात सुरू असलेली प्रकल्प कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना देत हि कामे निकृष्ट दर्जाचे झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अधिकाऱ्यांना आढावा बैठकीत दिला आहे. शहरातील चौक हे फेरीवाल्यांनी व्यापल्यामुळे या ठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडी होते असून हे सगळे चौक फेरीवाला मुक्त करुन सुशोभित करण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी बैठकीत दिल्या.

ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या कामांची सोमवारी पाहणी केल्यानंतर महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पालिका मुख्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीला वाहतूक विभागाचे अधिकारी, महापालिकेचे उपायुक्त तसेच प्रभाग समितीस्तरावर कार्यकारी अभियंता उपस्थित होते. कंत्राटदाराकडून सर्व कामे उत्कृष्ट दर्जाची करुन घेण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची राहिल आणि त्यामध्ये कोणतीही कसूर व काम निकृष्ट दर्जाचे आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येईल, असा इशारा बांगर यांनी दिला. वागळे इस्टेट विभागात सुरू असलेल्या कामांचा त्यांनी आढावा घेतला. रोड नं. १६ हे महत्वाचे जंक्शन असून या ठिकाणी अनेक ठिकाणचे रस्ते जोडले जातात. या रस्त्यावर ठिकठिकाणी यू टर्न आहेत, याबाबत वाहतूक विभागाशी चर्चा करून सद्यस्थितीत बॅरिगेटस् उभारुन वाहतूक कोंडी होते किंवा कसे याबाबत आढावा घेवून अनावश्यक यू टर्न बंद करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

Pune, Citizens rewarded, missing school girl,
पुणे : बेपत्ता शाळकरी मुलीची माहिती देणाऱ्या नागरिकांना पोलीस आयुक्तांकडून बक्षीस
mumbai municipal corporation, transparent administration
मुंबई महापालिकेचा कारभार पारदर्शी होणार? नागरिकांशी संवाद, संपर्क वाढविण्याचे मनपा आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आवाहन
High Court orders Municipal Corporation to remove illegal vendors from Hill Road
मुंबई : हिल रोडवरील बेकायदा विक्रेत्यांना हटवा, उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश
two cop suspended over controversy on closing dj
नागपूर: डीजे बंद करण्यावरून वाद, बळाचा वापर करणारे दोन पोलीस निलंबित

हेही वाचा: कसारा-इगतपूरी दरम्यान इंजिनची तीन चाके रुळांवरून घसरली ; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

रायलादेवी तलाव येथे सुरू असलेल्या कामाकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद केल्याबद्दल अधिकाऱ्यांना जाब विचारत कोणतेही काम निकृष्ट स्वरुपात केल्याचे आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल. साऊथ कोस्ट हॉटेलसमोरील एफओबीलगत असलेला रस्ता दुरावस्थेत असल्यामुळे नागरिक त्याचा वापर करीत नाहीत. त्यामुळे येथील पदपथाचे काम तातडीने करण्यात यावे. या चौकामध्ये दोन रस्ते ज्या ठिकाणी जोडले जातात, त्या रस्त्यांची पातळी एकसमान असली पाहिजे, रस्ते उंचसखल असल्यामुळे तेथे वाहनांची गती कमी होवून वाहतूक कोंडी होते. वाहतूक सुरळीत होण्याकरिता एकमेकांना जोडणाऱ्या रस्त्याची पातळी समान राहिल याकडे लक्ष देण्याच्या सूचनाहि त्यांनी यावेळी दिल्या.

अभियंत्याना त्यांचे क्षेत्र निश्चित करुन दिलेले असल्यामुळे त्यांनी प्रत्यक्ष जागेवर उपस्थित राहणे गरजेचे आहे. महत्वाच्या साईटच्या ठिकाणी दररोज भेटी देणे आवश्यक आहे. त्यांनी कार्यालयात बसून काम करणे अपेक्षित नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. रोड नं. १६ या मुख्य रस्त्यावर विविध ठिकाणी असलेल्या गतिरोधकाची दुरावस्था झाल्याने अपघात होण्याची शक्यता आहे, याबाबत वाहतूक विभागाशी समन्वय साधून गरज नसल्यास गतिरोधक काढावेत किंवा दुरूस्त करावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. शहरामध्ये अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला जुन्या भंगार गाड्या पडून राहिलेल्या दिसतात, या गाड्यामुळे तेथे अस्वच्छता होते, जागा व्यापली जाते, रस्ता अरुंद होते.

हेही वाचा: ठाणे : डोंबिवलीजवळील व्दारली जेथे जवाहिऱ्याच्या दुकानावर दरोडा

याबाबत महापालिका व वाहतूक पोलीस विभाग या दोघांनीही स्वतंत्रपणे वेळोवेळी कारवाई करुन या गाड्या हटविल्या जातील याबाबत दक्षता घेवून नागरिकांना रस्ते मोकळे करुन देणे गरजेचे आहे. सध्या रस्त्यावर शहरातील झेब्रा काँसिंग, साईडपट्टया, मिडीयन दाखवणाऱ्या पट्टया अस्तित्वात नाही, याबाबत संपूर्ण शहरात मोहीम घेऊन त्यात थर्मोप्लास्ट पेंटद्वारे त्या पेंट कराव्यात. ज्या ठिकाणी पार्किंग अनुज्ञेय आहे किंवा नो पार्किंग झोन आहे, त्या ठिकाणी तशा पध्दतीच्या रंगाच्या पट्टया थर्मोप्लास्टद्वारे पेंट करण्यात याव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा: कल्याण डोंबिवली पालिकेत दर दोन महिन्यांनी साहाय्यक आयुक्तांच्या बदल्या; सततच्या बदल्यांमुळे प्रभागातील कामकाजावर परिणाम

शहराच्या सौंदर्यीकरणावर भर द्या

सर्व प्रभाग vसमितीमध्ये सौंदर्यीकरणाची कामे होतील याबाबत कार्यवाही करावी, सर्व कार्यकारी अभियंत्यांनी त्यांच्या स्तरावर पथके तयार करावीत. तसेच संपूर्ण शहरात कामे होतील या दृष्टीने जलदगतीने कामे करावीत. महापालिकेने नुकतेच सौंदर्यीकरणबाबत अभियान सुरू केलेले आहे. यासाठी आपण विशिष्ट कालावधी निश्चित केलेला आहे. संपूर्ण महापालिका क्षेत्रात स्वच्छतेबरोबर सौंदर्यीकरणावर भर देवून त्यामध्ये दर्जा राखला जाईल यावर कटाक्षाने लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. दिलेल्या सूचनांनुसार सर्व कामे झाल्यानंतर पुन्हा पाहणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.