‘लोकसत्ता ठाणे’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘शॉपिंग फेस्टिव्हल’च्या निमित्ताने ग्राहकांना खरेदीसोबत आकर्षक बक्षिसे लुटण्याची संधी मिळाली असून ठाणेकरांकडून या उत्सवाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. २३ जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत साजरा होत असलेल्या या ‘फेस्टिव्हल’मधील पहिल्या तीन दिवसांच्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली असून त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. 

गतवर्षी आयोजित करण्यात आलेल्या ‘शॉपिंग फेस्टिव्हल’ला ग्राहकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाल्याने त्याच धर्तीवर यंदा अधिक व्यापक स्वरूपात या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली आणि कल्याण या उपनगरातील दुकानांचा या शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये सहभाग असून या भागातील दुकानांमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी उसळली होती. ठाण्यातील गोखले रोड परिसरातील दुकानांमध्ये ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ची माहितीपत्रके झळकत होती. त्यातच शनिवार, रविवारला जोडून प्रजासत्ताक दिनाची सुटी आल्याने या तिन्ही दिवशी खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती.
‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ला द रेमंड शॉप (स्टायलिंग पार्टनर), महिंद्रा गस्टो (टेस्ट राइड पार्टनर), वीणा वर्ल्ड (ट्रॅव्हल पार्टनर), जनकल्याण सहकारी बँक लि. (बँकिंग पार्टनर), वामन हरी पेठे अ‍ॅण्ड सन्स, तन्वी हर्बल, पितांबरी (प्लॅटिनम पार्टनर), टिप-टॉप प्लाझा, जीन्स जंक्शन, लॉलीपॉप आणि स्टायलो (असोसिएट पार्टनर), द ठाणे क्लब (हॉस्पिटॅलिटी पार्टनर), ज्युपिटर हॉस्पिटल (हेल्थ केअर पार्टनर), टायटन, जैन ट्रेडर्स, कलानिधी, मॅक इलेक्ट्रॉनिक्स आणि विष्णूजी की रसोई (गिफ्ट पार्टनर), मल्हार (डेकोर पार्टनर) यांचे सहकार्य लाभले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

’लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालेल्या दुकानांमध्ये २५० रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या खरेदी करून या उपक्रमात सहभागी होता येईल.
’खरेदी झाल्यानंतर दुकानामधून एक कूपन दिले जाईल हे कूपन पूर्ण भरून दुकानातील ड्रॉप बॉक्समध्ये टाका.
’या ड्रॉप बॉक्समधून प्रत्येक दिवशी भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात येणार असून त्यांना पारितोषिके दिली जाणार आहेत.
’फेस्टिव्हलच्या अखेरीस भाग्यवान विजेत्यांना कार, विदेश यात्रा, एल.ई.डी., टीव्ही, फ्रिज, मोबाइल्स, सोन्याची नाणी अशी पारितोषिके दिली जातील. विजेत्यांची नावे ‘लोकसत्ता ठाणे’त प्रसिद्ध केली जातील.