ठाणे : भिवंडीतील अवैधरित्या संप्रेरकांचा (हार्मोन) वापर गाई-म्हैशींच्या दूधाचे उत्पादन वाढविण्यासाठी केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अशा प्रकारच्या दूधाचे सेवन केल्यास दृष्टिहीनता, गर्भपात, त्वचेचे आजार अशा गंभीर आजाराला सामोरे जावे लागू शकते. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचा – अप्पर कोपर रेल्वे स्थाकातील फलाटावर छप्पर टाकण्याच्या कामाला प्रारंभ

हेही वाचा – सौंदर्या ”सोनचाफ्याचा भिवंडीत यशस्वी प्रयोग ! संतोष पाटील या शेतकऱ्याची यशस्वी फुलशेती, सूर्यफुलाच्या आंतरपिकातूनही उत्पन्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शांतीनगर भागातील किडवाईनगर परिसरात राहणारे दोघेजण अवैधरित्या संप्रेरकांचा साठा करून तो विक्री करत असल्याची माहिती औषध प्रशासन आणि पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पथकाने दोघांना ताब्यात घेतले. त्यांची विचारणा केली असता, या संप्रेरकांचा वापर गाई आणि म्हैशींच्या दूधाचे प्रमाण वाढविण्यासाठी केला जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. अशा प्रकारच्या दूधाचे सेवन केल्याने श्रवण दोष, दृष्टिहीनता, पोटाचे विकार, नवजात बालकाला कावीळ, गरोदर स्रीयांना रक्तस्राव आणि अनैसर्गिक गर्भपात, श्वसनाचा त्रास, त्वचेचे आजार अशा गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते, असे औषध प्रशासनाने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच हे संप्रेरके प्राण्यांना देऊन त्यांना क्रूरतेने वागणूक दिली आहे, असेही तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दोघेही अशिक्षित असल्याची माहिती पोलिसांनी दिली.