तो काळ लोटला जेव्हा स्त्रियांचा वावर चूल आणि मूल इतक्यापुरताच सिमित होता. हल्लीच्या स्त्रिया सर्वच क्षेत्रात पुरुषांच्याबरोबरीने खांद्याला खांदा लावून कार्यरत असलेल्या दिसतात. एके काळी केवळ पुरुषांचेच क्षेत्र असलेल्या टॅक्सी आणि रिक्षाचालकासारख्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेची परीक्षा घेणाऱ्या क्षेत्रातदेखील त्या मागे नाहीत. ठाणे शहरात आता ९३ महिला रिक्षा धावणार असून, या रिक्षांमध्ये प्रवाशांना चहा, वृत्तपत्र, मोबाईल चार्जिंग, वाय-फाय आदी सुविधा मिळणार आहेत. पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन झाले.

02-thane-mahila-auto

03-thane-mahila-auto