डोंबिवली: ठाकुर्ली पूर्व रेल्वे स्थानक भागातील रस्त्यावर मंगळवारी सकाळी वाहतूक नियोजनाचे काम करणाऱ्या एका महिला वाहतूक हवालदाराने भरधाव असलेल्या एका दुचाकी स्वाराला रोखले. दुचाकी स्वाराने या महिलेच्या हाताला झटका देऊन दुचाकी वेगाने पुढे नेली. ही दुचाकी पुढे जात असताना महिला हवालदाराच्या पायावरून गेली.

डोंबिवली वाहतूक शाखेतील हवालदार रेणुका राठोड यांच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. हवालदार राठोड मंगळवारी सकाळी ठाकुर्ली पूर्व रेल्वे स्थानक भागातील हनुमान मंदिर-चोळे रस्त्यावर वाहतूक नियोजनाचे काम करत होत्या. तेवढ्यात कल्याण दिशेने एक दुचाकी स्वार भरधाव आला. वळण घेत असताना इतर वाहने जाऊन द्यावीत म्हणून राठोड यांनी दुचाकी स्वाराला सूचना केली. तरीही दुचाकी स्वाराने हवालदार राठोड यांचे न ऐकता त्यांच्या पायावरून दुचाकी पुढे नेली.

हेही वाचा… कल्याण: विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या दोन जणांना अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राठोड यांनी दुचाकीची पाठीमागील बाजू पकडून त्याला रोखले. तेवढ्यात पादचारी, विक्रेते तेथे जमा झाले. वरिष्ठांना माहिती देऊन, या दुचाकी स्वारावर दंडात्मक कारवाई करून मग त्याला तेथून सोडण्यात आले.