कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्थानकाजवळील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या आगारात भुरट्या चोरांचा सुळसुळाट झाला आहे. प्रवासी आसनावर पिशवी ठेऊन पाणी आणणे, स्वच्छतागृहात गेला की या संधीचा गैरफायदा घेत भुरटे चोर आसनावरील पिशव्या चोरून नेत आहेत. दर आठवड्याला दोन ते तीन अशा चोरीच्या घटना घडत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या दहा दिवसापूर्वी पालघर येथील एका प्रवाशाची पिशवी चोरून त्यामधील दोन लाखाचा ऐवज चोरट्यांनी बसमधील पिशवीच्या माध्यमातून लंपास केला. कल्याण आगारात इतर जिल्हा, तालुक्याच्या ठिकाणाहून बस आली की आसन पकडण्यासाठी प्रवासी फलाटावरून रिकाम्या आसनावर पिशवी टाकून ठेवतात. बसमधील प्रवासी उतरले की मग बसमध्ये पिशवी टाकलेल्या जागेवर जाऊन बसतात. पिशवी आसनावर टाकून ठेवली की अनेक प्रवासी निश्चिंत राहून पाण्याची बाटली खरेदी, खाऊ खरेदी किंवा स्वच्छतागृहात जातात. या कालावधीत पाळत ठेऊन असलेले भुरटे चोर बसमधील प्रवाशाची पिशवी बसमधून किंवा खिडकीत हात घालून काढून घेतात आणि पळून जातात, अशा प्रवाशांच्या तक्रारी आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Theft thrive increase in kalyan st depo asj
First published on: 30-05-2022 at 11:55 IST