लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या दसरा मेळाव्यासाठी मंगळवारी हजारोंच्या संख्येने शिवसैनिक रेल्वेगाड्यांनी, खासगी वाहनाने दसरा मेळाव्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले. ढोल-ताशांच्या गजरात दोन्ही गटांकडून घोषणाबाजी करत शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

शिवसेनेच्या फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्यात माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचे मोठ्याप्रमाणात समर्थन मिळाले आहे. असे असले तरी खासदार राजन विचारे, शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्यासह काही जेष्ठ पदाधिकारी अद्यापही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे ठाण्यात शिंदे आणि ठाकरे असे दोन गट पडले आहे. ठाण्यात दोन्ही गटांमध्ये विस्तवही जात नसल्याची स्थिती आहे.

आणखी वाचा-डोंबिवली पश्चिमेत तीन बेकायदा इमारतींवर कारवाई, दसऱ्यानंतर विशेष तोडकाम मोहीम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज दोन्ही गटाचा मेळावा असल्याने सकाळपासून दोन्ही गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून दसरा मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुरू होती. शिंदे गटाचा मेळावा आझाद मैदानात असल्याने ठाण्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले. ठाकरे गटाचे पदाधिकारी दरवर्षीप्रमाणे यंदाही रेल्वेगाडीने निघाले होते. ठाकरे गटाचे नेते खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्त्वाखाली ठाण्यातील ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते जांभळी नाका येथून चालत ठाणे रेल्वे स्थानकातून रेल्वेगाडीने मुंबईच्या दिशेने निघाले. यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या.