scorecardresearch

Premium

डोंबिवलीत धोकादायक इमारत कोसळली, पालिकेने आधीच दिली होती नोटीस

ही इमारत लोड बेरिंग पद्धतीने बांधण्यात आली आहे. पालिकेने ही इमारत यापूर्वीच धोकादायक म्हणून जाहीर केली आहे

three story dangerous building collapsed in dombivli
धोकादायक इमारत कोसळली

डोंबिवली – येथील पूर्व भागातील आयरेगाव मध्ये शुक्रवारी संध्याकाळी एक तीन माळ्याची धोकादायक इमारत कोसळली. या इमारतीत एक महिला अडकली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शुक्रवारी संध्याकाळी आयरे गावातील लक्ष्मण रेषा इमारती जवळील आदिनारायण भुवन ही चार माळ्याची इमारत कोसळली. ही इमारत अनधिकृत आणि धोकादायक असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. या इमारतीचे दोन मजले कोसळले आहेत.

Municipality's move to start Daighar Waste Project
डायघर कचरा प्रकल्प सुरू करण्यासाठी पालिकेच्या हालचाली; पालिकेची संबंधित ठेकेदाराला नोटीस
citizens of pune, placards, protest, municipal corporation, e-toilets
पुण्यात ‘ई-टाॅयलेट’चे पुण्यस्मरण, नागरिकांनी निषेधाचे फलक लावत पालिकेला काढले चिमटे
Idgah Maidan Ganeshotsav
वादग्रस्त इतगाह मैदानावर गणेशोत्सवाला महानगरपालिकेची परवानगी
illegal building demolished in dombivli
डोंबिवलीत गावदेवी येथील बेकायदा इमारत भुईसपाट, उच्च न्यायालयाच्या आदेशाने पालिकेची रात्रंदिवस कारवाई

हेही वाचा >>> निर्माल्यासाठी कागदी पिशव्या बनविण्याचा उपक्रम; डोंबिवली विमेन्स सोसायटीचा पुढाकार

ही इमारत लोड बेरिंग पद्धतीने बांधण्यात आली आहे. पालिकेने ही इमारत यापूर्वीच धोकादायक म्हणून जाहीर केली आहे. या घटनेची माहिती मिळतात पालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन बचावाचे कार्य सुरू केले. पलिका आयुक्त डॉक्टर भाऊसाहेब दांगडे, ग प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त सोनम देशमुख यांनी तातडीने इमारत दुर्घटना ठिकाणी भेट दिली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Three story dangerous building collapsed in ayaregaon in dombivli zws

First published on: 15-09-2023 at 17:53 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×