scorecardresearch

Premium

चालियानिमित्त उल्हासनगरात वाहतूक बदल; अनेक रस्त्यांवर पार्कींग बंद, तर वाहतूकही वळवली

सिंधी बांधवांच्या पवित्र अशा चालिया उत्सवानिमित्त येत्या गुरूवारी उल्हासनगर शहरात कॅम्प एक भागातून हिरा घाटपर्यंत मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे.

Chalia occasion in Ulhasnagar
(सिंधी बांधव चालिया उत्सवासाठी चाळीस दिवसाच्या उपवासानंतर उल्हासनगरच्या झुलेलाल मंदिरात जमले होते. हजारो भाविकांनी यावेळी डोक्यावर मटकी घेऊन चालिया उत्सव साजरा केला.छाया – दीपक जोशी. )

उल्हासनगरः सिंधी बांधवांच्या पवित्र अशा चालिया उत्सवानिमित्त येत्या गुरूवारी उल्हासनगर शहरात कॅम्प एक भागातून हिरा घाटपर्यंत मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर शहराच्या विविध रस्त्यांवरची वाहतूक काही तासांसाठी वळवण्यात आली असून अनेक रस्त्यांवर वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे.

ठाणे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी याबाबत आदेश जाहीर करत बदललेल्या वाहतुक मार्गांची आणि पार्किंग मनाईबाबतची माहिती दिली आहे. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या चालिया पर्वाची सांगता उल्हासनगर शहरात दरवर्षी मिरवणुकीच्या माध्यमातून केली जाते. गुरूवार, २४ ऑगस्ट रोजी उल्हासनगर कॅम्प एक भागातील झुलेलाल मंदिरापासून या मिरवणूकीला सुरूवात होणार आहे. साधुबेला चौक, सिरू चौक, नेहरू चौक मार्गे लिंक रस्ता, न्यु इरा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पवई चौक ते हिराघाट अशी ही मिरवणूक असेल. या मिरवणूक मार्गावर वाहने नेण्यास आणि उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे. उल्हासनगर कॅम्प एक ते तीन दरम्यान पर्यायी वाहतूक झुलेलाल मंदिर मार्ग – भारत चौक – गोल मैदान – तसेच बिलगिट व इतर ठिकाणी जाणारी वाहतूक झुलेलाल चौक येथून खेमाणी, मासळी बाजारमार्गे इच्छित स्थळी जातील. उल्हासनगर वाहतूक उप विभाग समोरील चौक येथून भारत चौक मार्गे खेमाणी धोबीघाट झुलेलाल चौक मार्गे जाणारी सर्व प्रकारची वाहने उल्हासनगर वाहतूक उपविभाग कार्यालय येथून ओटी क्रमांक १ मार्गे बाबा बसंतराम दरबार मच्छी मार्केटमार्गे जातील.

shivsena pimpri, hou dya charcha campaign, shivsena uddhav thackeray faction, shivsena hou dya charcha in pimpri
पिंपरी-चिंचवडमध्ये आता ठाकरे गटाचे ‘होऊ द्या चर्चा’ अभियान
tribal agitation in gadchiroli
आदिवासींच्या आंदोलनाने गडचिरोली दोन तासांपासून ठप्प, भाजप आमदारांचा सर्वांसमक्ष पाणउतारा…
Amrit Kalash Yatra
मुंबई : महानगरपालिकेच्या अमृत कलश यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
cleaning campaign at mumbai beach, mumbai municipal corporation, bmc cleaning campaign at sea area
मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर कचऱ्याचे ढीग; महानगरपालिका व स्वयंसेवी संस्थांकडून स्वच्छता मोहीम

हेही वाचा >>>धक्कादायक! अडीच लाखात विकले १७ दिवसांचे बाळ..;आरोपीमध्ये आईचाही समावेश,वाचा प्रकार काय…

भारत चौकमार्गे गोल मैदान नेहरु चौककडे जाणारी वाहतूक मच्छी मार्केट तसेच बाबा बेफिक्री चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. नेहरु चौकमार्गे शिरु चौक तसेच खेमाणीकडे जाणारी वाहतुक मासळी बाजार, भारत चौक मार्गे जातील. शिवाजी चौकात अंबरनाथ कल्याण रस्त्याने कल्याणकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने फॉलवर लाईनमार्गे जवाहर हॉटेल – नेहरू चौक गोल मैदान मार्गाने इच्छित स्थळी जातील. तर मधुबन चौक गुरूद्वारा चौक शांतीनगर मार्गे तसेच कल्याण अंबरनाथ रोडने अंबरनाथ दिशेने जाणारी वाहतूक होंडा शोरुम येथे डावे वळण घेवून डॉल्फीन क्लब, गुरुद्वारा चौक इच्छित स्थळी जातील.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Traffic changes in ulhasnagar on the occasion of chalia amy

First published on: 22-08-2023 at 19:40 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×