लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आधारवाडी भागातील मैदानात होणार आहे. या सभेनिमित्ताने शहरातील अंतर्गत मार्गांवर वाहतुक बदल लागू करण्यात आले आहेत. हे वाहतुक बदल बुधवारी दिवसभर लागू असतील. त्यामुळे नागरिकांना पर्यायी मार्गांवर कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

आधारवाडी चौक सिग्नल ते गांधारी पूल, बापगाव मार्गावर प्रवेशबंदी असेल. येथील वाहने वाडेघर चौक, वाडेघर गाव, काशी दर्शन येथून निलकंठ सृष्टी गृहसंकुल मार्ग, रोनक सिटी, मुथा महाविद्यालय, वेदांत रुग्णालय मार्गे वाहतुक करतील. गांधारी चौक ते भट्टी चहा येथील संपूर्ण रस्त्यावर प्रवेशबंदी असेल. येथील वाहने भट्टी चहा, थारवानी इमारत, झुलेलाल चौक, गोदरेज हिल बारावेगाव मार्गे वाहतुक करतील.

आणखी वाचा-ठाणे : नरेंद्र मोदी यांच्या प्रचारामुळे जड अवजड वाहनांसाठी वाहतुक बदल

ऋतू इमारतीपुढील मार्गावर प्रवेशबंदी असेल. येथील वाहने ऋतू इमारत, वेदांत रुग्णालय, मुथा महाविद्यालय, जलकुंभ येथून वाहतुक करतील. डी. मार्ट येथून अग्रवाल महाविद्यालय, मातोश्री रुग्णालयाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद असेल. वाहने डी. मार्ट ते वसंत व्हॅली वायलेनगर मार्गे वाहतुक करतील. महाराजा अग्रसेन चौक येथून हिना गार्डन, तुलसीपुजा चौक, कस्तुरी पार्क, गणपती चौककडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी असेल. येथील वाहने महाराजा अग्रसेन चौक, वायलेनगर येथून खडकपाडा ते दुर्गाडी मुख्य वाहिनी मार्गे वाहतुक करतील.

डी. बी. चौक ते गणपती चौक, निक्कीनगर मार्गावर प्रवेश बंदी असेल. ही वाहने डी. बी. चौक ते ओम रेसीडन्सी येथून, निलकंठ सृष्टी सोसायटी, काशी दर्शन इमारत मार्गे , वाडेघर गाव वाडेघर चौक मार्गे जातील. आधारवाडी सिग्नल चौक ते आधारवाडी कारागृह, डी बी चौक रस्त्यावर वाहनांस प्रवेश बंद करण्यात येईल. येथील वाहतुक वाडेघर चौक, हनुमान मंदीर वाडेघर, काशी दर्शन इमारत, समर्थ कृपा गॅरेज, निलकंठ सृष्टी, ओम रेसीडन्सी समोरून जातील.

आणखी वाचा-शिपाई, फेरीवाला हटाव पथकात काम करणाऱ्या सफाई कामगारांना घनकचरा विभागात हजर राहण्याचे आदेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वायलेनगर पोलीस चौकी येथून आधारवाडी कारागृहाच्या दिशेने वाहतु करणाऱ्या वाहनांना या मार्गावर प्रवेश बंदी असेल. येथील वाहने वायलेनगर पोलीस चौकी ते वायलेनगर चौक येथून दुर्गाडी ते खडकपाडा मुख्य वाहिनी मार्गे जातील. क्रोमा शो-रुम येथून हरिश्चंद्र गायकर निवास, आधारवाडी चौक, रिलायन्स मार्ट, वायलेनगरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी असेल. येथील वाहने वायलेनगर, खडकपाडा चौक मार्गे वाहतुक करतील.