मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत पूलावरील खड्ड्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा फटका सहन करावा लागत आहे. शुक्रवारी सकाळपासून घोडंबदर मार्गावर या वाहतूक कोंडीचा फटका बसल्याने घोडबंदरहून ठाणे, नवी मुंबई, मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना १५ मिनीटांचे अंतर गाठण्यासाठी सुमारे दोन तास लागत आहे.

दरम्यान, शुक्रवारी पहाटेपर्यंत राज्य रस्ते विकास महामंडळाने साकेत पूलावरील खड्डे तात्पुरते बुजविले होते. पावसामुळे पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे पडले आहेत.

मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत पूलावर दोन्ही दिशेकडील मार्गिकेवर मोठ्याप्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे आज (शुक्रवार) सकाळी साकेत पूल ते घोडबंदर येथील पातलीपाडा पर्यंत वाहतूक कोंडी झाली. परिणामी घोडबंदरहून ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईत कामानिमित्त वाहतूक करणाऱ्यांचे हाल झाले. १५ मिनीटांचे अंतर कापण्यासाठी चालकांना सुमारे दोन तास लागत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर साकेत पूल ते कॅडबरी जंक्शन पर्यंतही वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे मुंबई, ठाण्याहून नाशिक, भिवंडीच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.