अंबरनाथः अंबरनाथ तालुक्यातील टाहुली डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या कुशिवली गावाच्या हद्दीत दोन मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. तरूण आणि तरूणी यांचे मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थतेत होते. दोघांची आत्महत्या केल्याचा संशय आहे. याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताह्यात घेतले. या मृतदेहांच्या शेजारी दोन बॅग आढळल्या आहेत. हे प्रेमी युगल असल्याची शक्यता व्यक्त होते आहे.

अंबरनाथ शहराच्या वेशीवर गुरूवारी एक शिर नसलेला मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर शुक्रवारी सकाळी अंबरनाथ तालुक्यातील टाहुलीच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या कुशिवली गावाच्या हद्दीत निर्जन ठिकाणी दोन मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हिललाईन पोलिसांना तात्काळ या ठिकाणी धाव घेतली. त्यांनी हे दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शव विच्छेदनासाठी ते उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रूग्णालयात पाठवले.

मृतदेह हे तरूण आणि तरूणीचा असल्याची प्राथमिक माहिती आहे. या दोन्ही मृतदेहांच्या शेजारी त्यांच्या बॅगाही आढळून आल्या आहेत. तसेच एक दुचाकीही आढळून आली आहे. हे दोघे प्रेमी युगल असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यांची ओळख अद्याप पटलेली नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. प्रेम प्रकरणातून ही आत्महत्या केली असावी असाही प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र या प्रकारानंतर या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली आणि आसपासचा परिसर हा पावसाळ्यात निसर्गरम्य परिसर म्हणून ओळखला जातो. या भागात टाहुली डोंगरातून अनेक धबधबे कोसळतात. त्यामुळे येथे अनेक पर्यटक येत असतात. अनेकदा या भागात गुन्हे घडल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता या प्रकाराचमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.