शहापूर : लोखंडी सळईच्या ट्रेलरचे चाक तपासत असताना ट्रेलर मधील सळयांची जबरीने चोरी करणाऱ्यांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करून दोघांनी पोबारा केला. तर एकाला पकडण्यात पोलिसांना शक्य झाले. या प्रकरणी ट्रेलर मधील सुमारे एक लाख किंमतीचे दोन टन वजनाचे सळया पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

मुंबई – नाशिक महामार्गावर लाहे गावच्या हद्दीतील एका हॉटेलजवळ सळयांची चोरी करणारे येणार असल्याची माहिती शहापुर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी महामार्गावरील लोहेगाव हद्दीत सापळा रचला होता. मंगळवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास हॉटेल जवळ सळयांनी भरलेले चार ट्रेलर आले. चालक हे ट्रेलरचे चाके तपासण्यासाठी थांबले होते. त्यावेळी तेथील राघवेंद्र, गौरव व रिशु सिंग हे तिघे ट्रेलर मधील सळया चोरी करीत असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी तात्काळ तिघांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांनी पोलिसांना धक्काबुक्की करून पोबारा केला. तर रिशु सिंग याला ताब्यात घेण्यात पोलिसांना शक्य झाले. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अलोक खिसमतराव करत आहेत.