scorecardresearch

कळव्यात घराच्या छताचे प्लास्टर पडून दोघे जखमी

पहाटे एका ४ मजली इमारतीमधील तळ मजल्यावरील एका घरातील छताचे प्लास्टर पडून दोघेजण जखमी झाल्याची घटना उघडकीस आली

roof collap
( संग्रहित छायचित्र )

ठाण्यातील बुधाजी नगर भागात आज (सोमवारी ) पहाटे एका ४ मजली इमारतीमधील तळ मजल्यावरील एका घरातील छताचे प्लास्टर पडून दोघेजण जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या जखमींना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचाकरिता दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> ठाणे जिल्ह्यात जनावरांना होणाऱ्या लंपीचा शिरकाव नाही

बुधाजी नगर भागात ३० वर्ष जुने बांधकाम असलेली दर्पण सोसायटी आहे. या सोसायटीच्या ए विंग मधील तळ मजल्यावरील एका घराच्या छताचे प्लास्टर पडले. या घटनेत घरातील प्रसन्न धंडोरे. (२२) यांच्या उजव्या हाताला आणि श्रद्धा धंडोरे (२७) यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली आहे. या दोघांना कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-09-2022 at 15:22 IST
ताज्या बातम्या