scorecardresearch

ठाणे: प्रजासत्ताकाची रक्षा करायची असेल तर रक्त नको मत द्या..; उद्धव ठाकरे यांचा जैन धर्मियांसमोर मताचा जोगवा

प्रजासत्ताकाची रक्षा करायची असेल तर रक्त नको तुमचे मत द्या.. असा मताचा जोगवा उद्धव ठाकरे यांनी जैन धर्मियांसमोर मागितला.

What Uddhav Thackeray Said?
उद्धव ठाकरे संग्रहित छायाचित्र

प्रजासत्ताकाची रक्षा करायची असेल तर रक्त नको तुमचे मत द्या.. असा मताचा जोगवा उद्धव ठाकरे यांनी जैन धर्मियांसमोर मागितला. यावेळी जैन धर्मिय सदैव तुमच्या सोबत असल्याचे आश्वासन जैन धर्मगुरूंनी उद्धव ठाकरे यांना दिले.

हेही वाचा >>>ठाणे: उद्धव ठाकरे येण्याचे कळताच शिंदे गटाकडून आनंद आश्रम हायजॅकचा प्रयत्न

उद्धव ठाकरे हे ठाणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी जैन धर्मियांच्या कार्यक्रमात उपस्थिती दर्शविली. तुम्ही रक्त मागितले तरी ते द्यायला तयार असल्याचे कार्यक्रमातील एका आयोजकाने भाषणात जाहीर केले. त्यावेळेस उद्धव यांनी त्यांच्या भाषणात प्रजासत्ताकाची रक्षा करायची असेल तर रक्त नको मत द्या.. असे म्हणाले. यावेळेस जैन धर्मगुरूंचे आशिर्वाद उद्धव यांनी घेतले. त्यावेळेस धर्मगुरूंनी त्यांना सैदव तुमच्या सोबत असल्याचे आश्वासन दिले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 15:04 IST