लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण: येथील पूर्व भागातील रेल्वे वसाहती जवळ मंगळवारी रात्री एका अज्ञात इसमाने एक तरुण आणि त्याच्या मैत्रिणीवर मारहाण करुन चाकुने हल्ला केला. कल्याण पूर्व रेल्वे स्थानक भागात वाढत्या गु्न्हेगारीमुळे नागरिक हैराण आहेत. कल्याण पूर्व भागातील स्कायवॉक, रेल्वे यार्डमध्ये संध्याकाळच्या वेळेत अनेक गर्दुल्ले या भागात येऊन बसतात. रात्रीच्या वेळेत ते गटाने या भागातून चाललेल्या प्रवाशाला अडवून त्याची लूटमार करतात, अशा प्रवाशांच्या तक्रारी आहेत.

plot developer killed by chopping his private parts in nagpur over illicit affairs
खळबळजनक! विवाहित प्रियकराचा गुप्तांग ठेचून खून? अनैतिक संबंधाची किनार…
jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
heavy traffic in patri pool area in kalyan
कल्याण : पत्रीपुलामुळे पुन्हा मनस्ताप, आता रस्ते कामामुळे अभूतपूर्व वाहतूक कोंडी
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला

पोलिसांनी सांगितले, कल्याण पूर्वेतील चिंचपाडा भागात राहणारे मयूर नाईक (२७) हे मंगळवारी रात्री सव्वा अकरा वाजता आपल्या रुपाली नावाच्या मैत्रिणीला कल्याण पूर्व रेल्वे स्थानक भागात दुचाकीवरुन आले होते. दुचाकीवरुन येत असताना मैत्रिणीच्या हातामधील पिशवी वजनदार असल्याने ती पिशवी दुचाकीवर मैत्रिणीला पेलवत नव्हती. तक्रारदार मयूर यांनी रेल्वे वसाहती जवळ दुचाकी थांबवली.

आणखी वाचा- ग्रामपंचायतीनेच केली २७ लाखांची वीज चोरी

मैत्रिणीच्या ताब्यातील जड पिशवी दुचाकीच्या पुढील भागात ठेवण्याचा प्रयत्न मयूरने केला. यावेळी तेथे एक अनोळखी इसम आला. त्याने तुम्ही येथे काय करता असा प्रश्न केला. आम्ही येथून जातोय, असे मयूर याने उत्तर देताच इसमाने मयूरच्या मुखात मारली. त्याला शिवीगाळ केली. जवळील चाकूने मयूरवर हल्ला केला. हा प्रकार पाहून घाबरलेल्या मैत्रिणीने दुचाकीवरुन उतरुन मयूरशी होत असलेला प्रकार रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी इसमाने मैत्रिणीवरही चाकूने हल्ला केला. मयूरने याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानकांवरील रेल्वे सुरक्षा जवानांची गस्ती कमी झाल्यामुळे हे प्रकार वाढले आहेत, अशा प्रवाशांच्या तक्रारी आहेत. डोंबिवली रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा जवानांचे अस्तित्व दिसत नसल्याचे प्रवासी सांगतात.