अखेर दोन वर्षानंतर करोना प्रादूर्भाव ओसरल्यामुळे सण-उत्सव साजरा करताना नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. परंतू, हे उत्सव साजरा करताना नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत आहे. दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन गुरुवारी पार पडले. यंदा सर्व सणउत्सवावरील निर्बंध हटविल्यामुळे दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जनही वाजतगाजत करण्यात आले. त्यामुळे दोन वर्षानंतर ठाणे शहरातील ध्वनी प्रदूषणात पुन्हा वाढ झाली असून दिवसभरात आवाजाची पातळी ८५ ते ९५ डेसिबलवर पोहचली आहे. शहरात सर्वाधिक प्रदूषण हे रात्री आठ वाजताच्या नंतर झाले असल्याचे प्रदूषण अहवालातून स्पष्ट होत आहे.

हेही वाचा >>> ठाणे : एमएमआरडीएच्या उपनियोजक अधिकाऱ्याला २४ हजारांची लाच घेताना अटक

करोना प्रादूर्भावामुळे गेले दोन वर्ष सर्वच सण-उत्सवांवर निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे सर्वच सण- उत्सव साध्यापद्धतीने साजरे करण्यात येत होते. त्यामुळे ध्वनी प्रदूषणात घट झाल्याचे दिसून आले होते. यंदा करोना प्रादूर्भाव ओसरला असून सण-उत्सवावरील निर्बंधही हटविण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा दहीहंडी पाठोपा्ठ गणरायाचे आगमनही ढोल-ताशांच्या गजरात करण्यात आल्याचे चित्र होते. दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त सण-उत्सव साजरा करताना नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. परंतू, करोना ओसरताच सण -उत्सव साजरा करताना नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होतान दिसून येत आहे. सर्वत्र ठिकाणी गुरुवारी दीड दिवसाच्या गणपतीला निरोप देण्यात आला. ठाणे शहरात या दीड दिवसाच्या गणपती विसर्जना वेळी वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली होती. त्यामुळे दोन वर्षानंतर शहारातील ध्वनी प्रदूषणात पुन्हा वाढ झाल्याचे दिसून आले. शहरातील राम मारुती रोड, पाचपाखाडी, ठाणे महापालिका मुख्यालयाजवळ, नितीन कंपनी, कॅडबरी जंक्शन, शिवाईनगर आणि उपवन भागात सर्वाधिक म्हणजेच ध्वनी प्रदूषण झाले आहे.

ठाणे शहरात गुरुवारी दिवसभरात आवाजाची पातळी ८५ ते ९५ डेसिबलवर पोहचली असल्याचे अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, यंदाच्या मिरवणूकीत फटाक्यांचा वापर कमी प्रमाणात झाल्याचे दिसून आले. तर, सर्वाधिक ध्वनी प्रदूषण हे रात्री ८ वाजताच्या नंतर झाले असल्याचे अहवालातून स्पष्ट होत आहे.

दीड दिवसाच्या गणपती विसर्जना दिवसाचा ध्वनी प्रदूषण अहवाल
ध्वनी प्रदूषणाची ठिकाण वेळ डेसिबल
राम मारुती रोड रात्री ८ वाजता ६० – ६५
रात्री ११ ते ११.३० वाजता ८५ – ९०

पाचपाखाडी रात्री ८.२५ वाजता ८५
रात्री ९.४५ वाजता ८० ते ८५

ठाणे महापालिकाजवळ रात्री ८.३० वाजता ६५ -७०
रात्री ८.३५ वाजता ७५ -८०
रात्री ९.३० वाजता ८५ – ९०

नितीन कंपनी रात्री ८.४० वाजता ८५ – ९०

कॅडबरी जंक्शन रात्री ८.५० वाजता ८५

शिवाई नगर रात्री ८.५५ वाजता ८५ -९०

उपवन रात्री ९ वाजता ७५ – ८०

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रतिक्रिया
ध्वनी प्रदूषणाचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत असतो. कोणत्याही उत्साहात सार्वजनिक शांतताही महत्त्वाची असते. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार रात्री १० वाजेपर्यंत वाद्यांना वाजविण्यास परवानगी आहे. परंतू, तरीही यंदा रात्री दहा नंतर बरेच ठिकाणी ध्वनी प्रदूषण झाल्याचे दिसून आले.– डॉ. महेश बेडेकर, सामाजिक कार्यकर्ते