‘लोकसत्ता सुवर्णलाभ’च्या बक्षीस वितरण सोहळ्यात आनंदाची उधळण

नेहमीप्रमाणे सोने खरेदी केले कारसारखे बक्षीस जिंकण्याचा मान मिळाला. हे बक्षीस आमच्यासाठी आनंदाची उधळण आहे, अशा कौतुकभरल्या भावनांनी ‘लोकसत्ता सुवर्णलाभ’ योजनेतील विजेत्यांनी आपल्या बक्षिसांचा स्वीकार केला. बोरिवलीचे विश्वनाथ तलवडेकर हे या योजनेतील प्रथम पुरस्काराचे विजेते होते.

‘लोकसत्ता सुवर्णलाभ’ योजनेंतर्गत केलेल्या सोन्याच्या खरेदीने त्यांच्या हातात चक्क नव्याकोऱ्या चारचाकी गाडीच्या किल्ल्या आल्या आहेत.

सुवर्ण खरेदीदार ग्राहक, सुवर्णकार तसेच मान्यवर व्यावसायिक यांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा सुवर्णक्षण ‘दिशा डायरेक्ट’ आणि ‘महाराष्ट्र सराफ सुवर्णकार महामंडळा’च्या सहकार्याने शुक्रवारी साधला. ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या ‘लोकसत्ता सुवर्णलाभ’ योजनेत हजारो लोकांनी सहभाग घेतला होता.

या योजनेत सहभागी झालेल्यांच्या प्रवेशिका एकत्र करून सोडत पद्धतीने निवडलेल्या सोळा विजेत्यांना शुक्रवारी ठाण्याच्या ‘टीप टॉप प्लाझा’मध्ये झालेल्या कार्यक्रमात बक्षिसांचे वितरण करण्यात आले.‘महाराष्ट्र सराफ सुवर्णकार महामंडळ’ यांच्या सहकार्याने आयोजित आणि ‘दिशा डायरेक्ट’ची प्रस्तुती लाभलेल्या या कार्यक्रमाला ‘लोकसत्ता सुवर्णलाभ’ योजनेत सहभागी झालेले सगळे सुवर्णकार उपस्थित होते.

या वेळी बोरिवलीचे विश्वनाथ तलवडेकर यांना प्रथम क्रमांकासाठी गाडी बक्षीस मिळाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्र सराफ सुवर्णकार महामंडळाचे संचालक अनिल वाघाडकर, महाराष्ट्र सराफ सुवर्णकार महामंडळाचे उपाध्यक्ष अजित पेंडुरकर, ‘ईशा टुर्स’चे आत्माराम परब, महाराष्ट्र सराफ सुवर्णकार मंडळाचे सचिव व ‘लागू बंधू’चे संचालक दिलीप लागू, ‘सॅन्सुई ग्रुप’च्या व्यवस्थापक भक्ती शहा, ‘श्री नेमीनाथ ज्वेलर्स’चे चिंतन जैन, ‘एस. एम. म्हाप्रळकर ज्वेलर्स’चे मोहन म्हाप्रळकर, ‘शिवकिर्ती ज्वेलर्स’च्या स्वाती अनवेकर, ‘एल.डी. घोडके सराफ’चे सचिन घोडके,  ‘डोंबिवली नागरी सहकारी बँके’चे मिलिंद आरोळकर यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानपूर्वक बक्षिसे प्रदान करण्यात आली.