उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी प्रभाग आरक्षण सोडत जाहीर झाली. जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीने शहरातील सर्वच प्रभागाती राजकीय चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. प्रभागनिहाय आरक्षणाच्या नव्या यादीत अनेक प्रभाग महिलांसाठी, अनुसूचित जाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग यांच्यासाठी राखीव झाल्याने खुल्या वर्गातील अनेक इच्छुक उमेदवारांचे समीकरण कोलमडले आहे. एकूण ७८ सदस्यांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत २० प्रभागात चार सदस्य रिंगणात राहतील. यातील दोन प्रभाग महिलांसाठी राखीव असणार आहेत.
उल्हासनगर महापालिकेची निवडणूक यापूर्वी २०१७ वर्षात झाली होती. त्यानंतर आठ वर्षांनंतर महापालिका निवडणुकांची तयारी सुरू आहे. सर्वच पक्षांनी त्यासाठी तयारी सुरू केली आहे. शहरात महायुतीतील पक्षांमध्येच प्रमुख लढत होणार असल्याचे चित्र आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाच्या गोटात असलेले कलानी यंदा शिवसेनेच्या गोटात दाखल झाले आहेत. सर्वच पक्षांकडून एकमेकांच्या पक्षातील ताकदवान उमेदवारांना आपल्याकडे खेचण्याची चढाओढ सुरू आहे. त्यातच मंगळवारी प्रभाग आरक्षणासाठी सोडत संपन्न झाली. उल्हासनगरच्या कॅम्प तीन येथील मेजर अरूणकुमार वैद्य सभागृहात ही सोडत पार पडली. महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी राज्य निवडणूक आयोगाच्या नियमांन्वये सोडत प्रक्रिया राबवण्यात आली.
उल्हासनगर शहरात एकूण २० प्रभाग असून यंदा चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक होणार आहे. शहरातील एकूण सदस्यांची संख्या ७८ आहे. त्यापैकी ४३ जागा खुल्या प्रवर्गातील असणार आहेत. तर अनुसूचित जातीसाठी १३ तर त्यातील महिलांसाठी ७, अनुसूचित जमातीसाठी असलेली एकमेव जागा महिलेसाठी आरक्षित असणार आहे. तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी २१ जागा आरक्षित असणार आहेत. त्यातील ११ जागा महिलांसाठी असतील. एकूण ७८ जागांपैकी ३९ जागा या महिलांसाठी आरक्षित असणार आहेत.
यंदाच्या आरक्षणात एकूण प्रभागांपैकी जवळपास प्रत्येक दुसरा प्रभाग हा महिला आरक्षण किंवा अनुसूचित जाती , नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षणात गेला आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीत विजयी झालेले काही बडे माजी नगरसेवक यावेळी आपल्या पारंपरिक प्रभागातून उमेदवारी अर्ज दाखल करू शकणार नाहीत. एकतर त्यांना घरातील महिलेला संधी द्यावी लागणार आहे की स्वतःसाठी सुरक्षित प्रभाग शोधावा लागणार आहे.
उल्हासनगर महानगरपालिका निवडणूक २०२५ – आरक्षण सोडत
प्रभाग क्रमांक – १
अ – अनुसूचित जाती
ब – अनुसूचित जमाती महिला
क – नागरिकांचा मागास प्रवर्ग
ड – सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक – २
अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – ३
अ – अनुसूचित जाती महिला
ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – ४
अ – अनुसूचित जाती
ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – ५
अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – ६
अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – ७
अ – अनुसूचित जाती महिला
ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
क – सर्वसाधारण
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – ८
अ – अनुसूचित जाती महिला
ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
क – सर्वसाधारण
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – ९
अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – १०
अ – अनुसूचित जाती
ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – ११
अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – १२
अ – अनुसूचित जाती महिला
ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – १३
अ – अनुसूचित जाती
ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – १४
अ – अनुसूचित जाती महिला
ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
क – सर्वसाधारण
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – १५
अ – अनुसूचित जाती
ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – १६
अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – १७
अ – अनुसूचित जाती
ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – १८
अ – अनुसूचित जाती महिला
ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
क – सर्वसाधारण
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – १९
अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – २०
अ – अनुसूचित जाती महिला
ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
क – सर्वसाधारण
