कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने महापालिकेवर अवलंबून राहण्यापेक्षा गृहसंकुलाच्या आवारात त्याची विल्हेवाट लावण्याचा उपक्रम ठाण्यातील फ्लॉवर व्हॉली संकुलाच्या वतीने रविवारी सुरू करण्यात आला. इमारतीमधील सुका आणि ओला कचरा वेगळा करण्यात येणार असून गृहसंकुलाच्या परिसरात सुरू करण्यात आलेल्या कंपोस्ट खत प्रक्रिया केंद्रात टाकण्यात येणार आहे. त्यापासून तयार होणारे खत संकुलाच्या बागेसाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे या गृहसंकुलाला कचरा व्यवस्थापनासाठी महापालिकेवरील भार कमी होण्यास मदत होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे शहराच्या शहरीकरणाचा वेग प्रचंड वाढला असून या नागरिकांना पायाभूत सुविधा देण्यात महापालिका प्रशासनावर प्रचंड ताण येऊ लागला आहे. त्यामुळे पाणी आणि कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने स्वयंपूर्ण होण्यास नागरिकांकडून प्रयत्न सुरू होत आहेत. गृहसंकुलातील कचऱ्याचा विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने ठाण्यात प्रयत्न सुरू झाले आहे. त्यातूनच शून्य कचरा मोहीम वाढीस लागली आहे. ठाण्यातील फॉवर व्हॉली या गृहसंकुलाने त्यासाठी पुढाकार घेतला असून संकुलांच्या आवारातच कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा विधायक निर्णय घेतला आहे. या संकुलातील रहिवाशांनी हरियाली संस्थेच्या सहकार्याने रविवारी संकुलाच्या आवारामध्ये कंपोस्ट खत तयार करण्यास शुभारंभ केला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Waste management in thane residential
First published on: 26-05-2016 at 01:51 IST