या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण : कल्याण जवळील शहाड येथे पोलीस पाटील असलेल्या पतीने पत्नीला रात्रीच्या वेळेत मोबाईल हाताळण्यास दिला नाही. त्याचा राग येऊन रागावलेल्या पत्नीने देव्हाऱ्यातील लाकडी पाट पोलीस पाटील असलेल्या पतीच्या डोक्यात मारुन गंभीर दुखापत केली आहे. तसेच पोलीस पाटलाला बघून असे बोलून धमकी दिली आहे.

खडकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी पोलीस पाटलाच्या तक्रारी वरुन पोलिसांनी पत्नी विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. जयेंद्र दिनकर पाटील (३६, रा. पाटील निवास, हनुमान मंदिरा जवळ, शहाड, कल्याण पश्चिम) असे तक्रारदार पोलीस पाटील यांचे नाव आहे. शमिका जयेंद्र पाटील (२७) असे मारहाण करणाऱ्या आरोपी पत्नीचे नाव आहे.

हेही वाचा : ठाण्यात गणेश मुर्तीं विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती ; गणेशोत्सवासाठी महापालिका यंत्रणा सज्ज

पोलिसांनी सांगितले, पोलीस पाटील जयेंद्र पाटील रविवारी रात्री साडे दहा वाजता भोजन झाल्यावर शय्या गृहात मोबाईल हातात घेऊन त्या मधील बातम्या बघत बसले होते. त्याच वेळी जयेंद्र यांची पत्नी शमिका त्यांच्या जवळ मोबाईल देण्याची मागणी करू लागली. बातम्या बघतोय थोड थांब, असे पोलीस पाटील जयेंद्र बोलत असतानाच, पत्नी शमिकाने पतीच्या हातामधील मोबाईल हिसकावून घराच्या कोपऱ्यात फेकून दिला. मोबाईलची मोडतोड केली.

हेही वाचा : ठाण्यातील खड्डे बुजवले नाहीतर गणेशोत्सवनंतर रस्त्यावर उतरू; मनसेचा पालिका नगर अभियंत्यांना इशारा

‘तुझ्यामुळे माझे जीवन उद्धवस्त झाले आहे. तु आमच्या मध्ये येतोस. तुला मी व राहुल भंडारी बघून घेऊ,’ असे बोलत पुजेसाठी लागणारा लाकडी पाट उचलून तो पोलीस पाटील जयेंद्र यांच्या डोक्यात मारला. पाटील यांच्या डोक्यात दुखापत झाली आहे. राहुल भंडारीला बोलावून तुझे काम आता तमाम करुन टाकते, अशी धमकी दिली म्हणून तक्रारदार जयेंद्र पाटील यांनी पत्नी शमिका विरुध्द खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलीस उपनिरीक्षक ए. एम. जाधव या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wife beat up by husband for not allowing her to handle her mobile phone all night in kalyan tmb 01
First published on: 29-08-2022 at 15:14 IST