आतापर्यंत ४९ कोटींचा दंड वसूल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : मुंबईतील करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेने मुखपट्टीविना फिरणाऱ्या नागरिकांविरोधात मोठय़ा प्रमाणावर कारवाई सुरू के ली आहे. आतापर्यंत  ४९ कोटींचा दंड  वसूल करण्यात आला आहे.

शुक्रवारी दिवसभरात १७,८५३ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मुंबई पोलिसांनाही कारवाईचे अधिकार देण्यात आले असून रेल्वेतही कारवाईने वेग घेतला आहे. पोलीस, रेल्वे आणि मुंबईभर पालिके ने के लेल्या कारवाईतून एका दिवसात ३६ लाख ४२ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

मुंबईत अनेक जण विनामुखपट्टी फिरत असताना आढळून येतात. त्यामुळे आता पुन्हा एकदा मुखपट्टीविना फिरणाऱ्यांविरुद्धची कारवाई पालिके ने तीव्र के ली आहे. मुखपट्टीविना फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी पालिके ने फे ब्रुवारीमध्येच क्लिन अप मार्शल्सची संख्या दुप्पट के ली.

तसेच दररोज २५ हजार जणांवर कारवाई करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले होते.

मुंबईतील पश्चिम, मध्य आणि हार्बर उपनगरीय रेल्वे गाडय़ांमध्ये मुखपट्टीविना प्रवास करणाऱ्यांवर कारवाईसाठी प्रत्येक रेल्वे मार्गावर १०० यानुसार एकूण ३०० मार्शल्स नेमण्यात आले आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Without mask action public corona virus infection corona patient akp
First published on: 04-04-2021 at 01:21 IST