निवडणूक आयोगाचा अजब कारभार
मतदानासोबतच विविध सरकारी अर्जासाठी महत्त्वाचा दस्तावेज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवडणूक मतदार ओळखपत्राच्या बाबतीत निवडणूक आयोगाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आणखी एक नमुना वसईतून उघड झाला आहे. वसईतील काही भागांत मतदारांना देण्यात येणाऱ्या ओळखपत्रांवर निवडणूक अधिकाऱ्याची सही आणि शिक्काच नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ही ओळखपत्रे अवैध ठरण्याची भीती आहे.
नायगावच्या जूचंद्र येथे राहणाऱ्या किरण पार्टे या तरुणाच्या कुटुंबीयाने दोन वर्षे अर्ज केल्यानंतर त्यांचे नाव मतदार यादीत आले. येथीेल रश्मीे स्टार सिटी या भागातीेल अनेक रहिवाशांनी मतदार यादीत नावे टाकण्यासाठी अर्ज भरून दिले होते. नुकतेच त्यांना एका स्थानिक राजकीय पक्षाच्या वतीेने मतदार ओळखपत्रे वाटण्यात आलीे. परंतु किरणच्या मतदार ओळखपत्रावर मतदार नोंदणीे अधिकाऱ्याचीे सही किंवा शक्काच नव्हता. त्याच्या इमारतीेत एकूण पन्नास मतदार ओळखपत्रे वाटण्यात आलीे. त्यातीेल ३० जणांना अशीे कोरी ओळखपत्रे देण्यात आलीे. याबाबत बोलताना किरणने सांगितले की आम्ही गेल्या तीेन वर्षांत चार वेळा मतदार यादीत नावे टाकण्यासाठी अर्ज केला होता. मागीेंल लोकसभा निवडणुकीत आमचीे नावे आलीे. पण सोमवारी जेव्हा हातात मतदार ओळखपत्र पडलीे तेव्हा धक्का बसला. माझ्या बहिणीेचे ओळखपत्र व्यवस्थित आहे, परंतु माझ्या ओळखपत्रावरून सही आणि शिक्का गायब आहे. साहजिकच हे ओळखपत्र वैध धरले जाणार नाही. त्यामुळे पुन्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे हेलपाटे घालावे लागणार अशीें खंत त्याने व्यक्त केलीे. एका ओळखपत्रात चूक होऊ शकते, परंतु आमच्याच इमारतीेंत ३० जणांच्या ओळखपत्रात एवढी मोठी चूक कशीें होऊ शकते असा सवालही त्याने केला. केवळ सहीच नाही तर माझे वयसुद्धा एक वर्षांनी वाढवल्याचे त्याने सांगितल, तसेच इतर मतदारांची नावे चुकवण्यात आले असल्याचेही तो म्हणाला.