ठाणे : भिवंडी येथील काल्हेर भागात एका २८ वर्षीय महिलेने घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तीन दिवस तिचा मृतदेह घरामध्येच पडून होता. शेजाऱ्यांना घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी महिलेचा प्रियकर विकास अडगळे याच्याविरोधात गुन्हा दाखल  करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

 काल्हेर येथील जय माता दी कंपाऊंड परिसरात गेल्या दोन वर्षांपासून महिला ही तिचा प्रियकर विकास अडगळे आणि तिच्या पाच वर्षांच्या मुलीसोबत राहत होती. परंतु विकासला दारू पिण्याचे व्यसन होते. यातून तो तिला वारंवार मारहाण करत असे. २१ एप्रिलला त्यांच्या घराला कुलूप असतानाही घरातून मोठय़ा प्रमाणात दुर्गंधी सुटली होती. त्यामुळे त्यांच्या शेजाऱ्यांनी तात्काळ याची माहिती नारपोली पोलिसांना दिली. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कुलूप तोडून घराच्या आत प्रवेश केला असता महिलेचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती नारपोली पोलिसांनी महिलेच्या कुटुंबीयांना दिली. गुरुवारी महिलेच्या बहिणीने विकास अडगळे याच्याविरोधात दिलेल्या तक्रारीच्या आधारे नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

तीन दिवस मृतदेह घरातच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विकास आणि महिला यांच्यात प्रेमसंबंध होते. ती पतीला सोडून तिच्या पाचवर्षीय मुलीसोबत विकासकडे राहण्यास आली होती. काही दिवसांपूर्वीच महिलेने तिच्या मुलीला माहेरी राहण्यास नेले होते. त्यामुळे विकास आणि ती महिला असे दोघेच घरामध्ये वास्तव्यास होते. १८ एप्रिलला  महिलेने घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी विकास घरी आल्यानंतर त्याने हा प्रकार पाहिला. त्यामुळे तो घाबरून घरातून निघून गेला. सांयकाळी पुन्हा घरी परतल्यानंतर त्याने मृतदेह खाली काढून ठेवला. नंतर त्याने कुलूप लावले व कळव्याला पळून आला.