scorecardresearch

Premium

कल्याण रेल्वे स्थाकाजवळील लॉजमध्ये महिलेची हत्या

कल्याण येथील पश्चिम रेल्वे स्थानक भागातील तृप्ती लॉजमध्ये एका महिलेचा मृतदेह रविवारी सकाळी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

Woman killed in lodge near Kalyan railway station
महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस या फरार इसमाचा शोध घेत आहेत.(फोटो- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : येथील पश्चिम रेल्वे स्थानक भागातील तृप्ती लॉजमध्ये एका महिलेचा मृतदेह रविवारी सकाळी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या महिलेसोबत आलेला एक इसम हत्या केल्यानंतर फरार झाला आहे. महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस या फरार इसमाचा शोध घेत आहेत.

man arrested for molesting young woman in train
मुंबई : रेल्वेत तरूणीचा विनयभंग करणाऱ्याला अटक
10 fast local trains on Central Railway from Dadar station towards Kalyan as per new schedule
मध्य रेल्वेवर दहा जलद लोकल, नव्या वेळापत्रकानुसार दादर स्थानकातून कल्याणच्या दिशेने फेऱ्या
Two injured during demolition mumbai
बोरिवली येथे इमारतीच्या पाडकामादरम्यान दोन जखमी, राडारोडा चालत्या रिक्षावर पडला
Due to the demand of AC coaches in railways there is a decrease in slipper coaches
रेल्वेत ‘एसी कोच’ला मागणी असल्याने ‘स्लिपर कोच’मध्ये घट; मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणाले…

ज्योती तोरडमल असे मयत महिलेचे नाव आहे. ती घाटकोपर येथील रहिवासी आहे. भूपेद्र गिरी हा इसम शनिवारी दुपारी ज्योतीला घेऊन तृप्ती लॉज मध्ये आला होता. या कालावधीत गिरीने ज्योतीची हत्या केली. शनिवारी रात्री गिरीने लॉज व्यवस्थापकाला मी बाजारातून काही सामान घेऊन येत आहे, असे कारण देत लॉजमधून फरार झाला. रविवारी सकाळी गिरी राहत असलेल्या लॉजचा दरवाजा कर्मचारी ठोठावत होते. आतून काही प्रतिसाद मिळत नव्हता. कर्मचाऱ्यांनी दरवाजाची आतील कडी तोडून खोलीत प्रवेश केला. त्यांना ज्योतीचा मृतदेह बिछान्यावर पडला असल्याचे दिसले. खोलीत तिचा सोबत भूपेंद्र नसल्याचे आढळले.

आणखी वाचा-पायी अयोध्येला जाणाऱ्या रामभक्तांना मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा कंदील

पोलिसांनी तातडीने दोन तपास पथके तयार करून गिरीचा शोध सुरू केला आहे. त्याच्या अटकेनंतर या खुनाचे कारण समजेल असे पोलिसांनी सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Woman killed in lodge near kalyan railway station mrj

First published on: 10-12-2023 at 21:02 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×