लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली : सकाळच्या वेळेत नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी गेलेली महिला डोंबिवलीतून बेपत्ता झाली आहे. या महिलेचा तिचे नातेवाईक मागील बारा दिवसांपासून शोध घेत आहेत. पण ही महिला कुठेच आढळून येत नसल्याने कुटुंबीय हवालदिल झाले आहेत. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.

सोनी दयानंद सिन्हा (४७) असे महिलेचे नाव आहे. ती डोंबिवली पू्र्वेतील सावरकर रस्ता भागात आपल्या कुटुंबियांसह राहत होती. दयानंद सिन्हा यांनी या बेपत्ता प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

dombivli illegal chawls demolished
डोंबिवलीत गोदामे, बेकायदा चाळी भुईसपाट
24 hours water supply stop to Kalyan-Dombivli Taloja and Ulhasnagar
कल्याण-डोंबिवली, तळोजा, उल्हासनगरचा पाणी पुरवठा चोवीस तास बंद
dombivli marathi news, ayregaon chawl demolished marathi news
डोंबिवलीत आयरेगावातील बेकायदा चाळी जमीनदोस्त, मढवी बंगल्याजवळील सात माळ्याच्या बेकायदा इमारतीवर कारवाई
kalyan passengers marathi news, dombivli kalyan local trains marathi news
सकाळच्या डोंबिवली, कल्याण लोकल रद्द केल्याने प्रवासी संतप्त

आणखी वाचा-मेट्रो कामांमुळे घोडबंदर मार्गावर मध्यरात्री वाहतुक बदल

पोलिसांनी सांगितले, सोनी सिन्हा या गेल्या दहा दिवसापूर्वी नेहमीप्रमाणे सावरकर रस्ता येथून डोंबिवली परिसरातील रस्त्यांवर फिरण्यासाठी गेली. एक तासाने ती परत येणे आवश्यक होते. परंतु, दुपार झाली तरी आई घरी आली नाही म्हणून कामावर गेलेल्या वडिलांना मुलांनी संपर्क करून आई घरी आली नसल्याचे सांगितले. पतीने तातडीने कार्यालयातून घरी येणे पसंत केले. दरम्यानच्या काळात मुलांनी आईच्या व्हॉट्सप क्रमांकावर संपर्क केला. त्यावेळी तिने आपण लोकलमध्ये आहोत. आपल्या मोबाईलची विजेरी संपत आली आहे. त्यामुळे मोबाईल काही मिनिटांनी प्रतिसाद देणार नाही. त्यानंतर सोनी यांचा मोबाईल बंद झाला. त्यावर सतत संपर्क करूनही त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

सिन्हा कुटुंबियांनी डोंबिवली, मुंबई शहर परिसरातील आपल्या नातेवाईकांकडे सोनी यांचा शोध घेतला. त्या कुठेच आढळून आल्या नाहीत. रामनगर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.