ठाणे : शिळ डायघर पोलीस ठाण्याच्या आवारात पोलीस शिपाई ज्योती मुंढे यांना शबनम खान आणि हसीना खान यांनी शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिळ-डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

हेही वाचा – ठाणे महापालिकेपुढे कचरा कोंडीचा पेच; स्थानिकांच्या विरोधामुळे डायघर कचरा प्रकल्प अडचणीत

हेही वाचा – ठाणे : कामगारांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिळ डायघर पोलीस ठाण्यात ज्योती मुंढे या कार्यरत आहेत. सोमवारी मध्यरात्री हसीना आणि शबनम या दोन महिला त्यांच्या घरगुती वादातून शिळ-डायघर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आल्या होत्या. पोलीस कर्मचारी उपस्थित असतानाही पोलीस ठाण्याच्या आवारात त्या जोर-जोरात गोंधळ घालत होत्या. त्यामुळे ज्योती मुंढे या त्यांची समजूत काढण्यासाठी गेल्या असता, त्यांना या महिलांनी शिवीगाळ आणि धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. या धक्काबुक्कीत ज्योती यांच्या मानेला दुखापत झाली. त्यानंतर दोघी महिला पोलीस ठाण्याच्या आवारातून पळून गेल्या. याप्रकरणी दोघींविरोधात शिळ-डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.