लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : ठाण्यातील तीन हात नाका येथे वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. बुधवारी दुपारी येथील मेट्रोच्या गर्डरवरून खाली पडून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अपघात कसा झाला याची चौकशी केली जात आहे.

rod attack on st bus conductor marathi news
बारामतीमध्ये महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच आता नागपुरात एसटी वाहकावर रॉडने हल्ला…
Water wastage due to leakage of Ransai Dam water channel
उरण : रानसई धरणाच्या जलवाहिनीच्या गळतीमुळे पाणी वाया
Traffic Routes Altered as Nashik s CBS to Canada Corner Road Undergoes 18 Month Concreting Work
काँक्रिटीकरणासाठी नाशिकमधील आठ रस्ते बंद – सीबीएस- कॅनडा कॉर्नर मार्गावर एकेरी वाहतूक
tank bomb shell Hinjewadi
हिंजवडीत पुलाचे काम करताना रणगाड्याचे बॉम्बशेल सापडले

आणखी वाचा-मुख्यमंत्र्यांची छबी असलेली बेकायदा हातगाडी हटवली, कल्याण-डोंबिवली पालिकेची कारवाई

वडाळा-घाटकोपर-कासारवडली या मेट्रो चार मार्गिकेचे निर्माणाचे काम ठाण्यात सुरू आहे. या मार्गिकेच्या निर्माणादरम्यान यापूर्वी अनेक अपघात झाल्याची नोंद आहे. काही महिन्यांपूर्वी मेट्रोचा पत्रा अंगावर पडून एका महिलेचा मृत्यू झाला होता. तीन हात नाका येथे बुधवारी दुपारी गर्डरवरून खाली पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. घटनास्थळी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात दाखल झाले असून याप्रकरणाची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.