scorecardresearch

Premium

मुख्यमंत्र्यांची छबी असलेली बेकायदा हातगाडी हटवली, कल्याण-डोंबिवली पालिकेची कारवाई

डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाच्या प्रवेशव्दारावर मुख्यमंत्र्यांची छबी असलेली शिव वडापावची हातगाडी ठेवण्यात आली होती.

Illegal handcart with Chief Ministers picture removed action taken by Kalyan-Dombivli Municipality
मंगळवारी रात्री ही हातगाडी पालिकेच्या पथकाने हटविण्याची कारवाई केली. (फोटो- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली – डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाच्या प्रवेशव्दारावर मुख्यमंत्र्यांची छबी असलेली शिव वडापावची हातगाडी ठेवण्यात आली होती. स्थानिक नागरिकांचा विरोध आणि मंत्रालय स्तरावरून झालेल्या जोरदार हालचालीनंतर अखेर मंगळवारी रात्री ही हातगाडी पालिकेच्या पथकाने हटविण्याची कारवाई केली.

gadchiroli medigadda dam marathi news, medigadda dam became dangerous marathi news, medigadda dam cracks marathi news
धोकादायक ‘मेडीगड्डा’ धरणामुळे दोन राज्यांतील नागरिकांचा जीव टांगणीला! राजकीय आरोप- प्रत्यारोप
nagpur crime news, nandanvan area crime news,
गृहमंत्र्यांच्या शहरात आणखी दोन हत्याकांड… उपराजधानातील कायदा व सुव्यवस्था वाऱ्यावर
Change in Lonavala local timetable immediately after the start of afternoon trains
लोणावळा लोकलबाबत रेल्वेचा मोठा निर्णय! दुपारच्या गाड्या सुरू केल्यानंतर लगेचच वेळापत्रकात बदल
Apathy in water shortage crisis public representatives and officials absent for review meeting
पाणी टंचाईच्या सावटात अनास्था; आढावा बैठकीकडे लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांची पाठ

अनेक वर्षापासून डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त आहे. या भागातील रस्ते, पदपथ मोकळे राहत असल्याने प्रवासी समाधान व्यक्त करतात. गेल्या आठवड्यात अचानक रात्रीच्या वेळेत दिनदयाळ चौकात रेल्वे स्थानकाच्या समोरील भागात स्कायवॉक खाली शिव वडापावची हातगाडी ठेवण्यात आली. या हातगाडीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांची छबी होती. या हातगाडीवर कारवाई करू नये म्हणून ही छबी लावण्यात आली होती. तसेच या हातगाडीवर कारवाई करू नये म्हणून एका लोकप्रतिनिधीच्या स्वीय साहाय्यकाने पालिका अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याची पालिकेत चर्चा होती.

आणखी वाचा-डोंबिवलीत कारच्या धडकेत विद्यार्थीनी गंभीर जखमी

वर्दळीच्या रस्त्यावर अचानक हातगाडी दिसू लागल्याने स्थानिक माजी नगरसेवक शैलेश धात्रक, नाख्ये उद्योग समुहाच्या संचालकांनी ह प्रभाग साहाय्यक आयुक्त स्नेहा करपे यांना संपर्क करून हातगाडी तातडीने हटविण्याची मागणी केली होती. तसेच गाडी हटविली नाहीतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला होता. एकीकडे राजकीय दबाव तर दुसरीकडे हातगाडी हटविण्याची नागरिकांची मागणी यामुळे अधिकाऱ्यांची कोंडी झाली होती.

कोणत्याही परिस्थितीत हातगाडी हटवू नये, असे आदेश स्वीय साहाय्यकाने अधिकाऱ्यांना दिले होते. आयुक्त जाखड यांनी पालिका हद्दीतील रेल्वे स्थानक परिसरात एकही फेरीवाला दिसता कामा नये असे आदेश साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. तरीही ह प्रभाग हद्दीतील रेल्वे स्थानका जवळील हातगाडी हटवली जात नव्हती. या प्रकाराने नागरिक संतप्त होते. हातगाडी हटवित नसल्यामुळे नागरिकांनी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला होता.

आणखी वाचा-भाजप आमदार गायकवाड यांची मनसे आमदार प्रमोद पाटील यांच्याकडून पाठराखण

मंत्रालयातून दबाव

डोंबिवली विधानसभा मतदारसंघ सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अखत्यारीत येतो. काही नागरिकांनी या हातगाडीविषयी मंत्री चव्हाण यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. दोन दिवसात मंत्रालयात या बेकायदा हातगाडी विषयी जोरदार चक्र फिरली. वरिष्ठ पालिका अधिकाऱ्यांना योग्य निरोप देण्यात आला. ही बेकायदा हातगाडी मंगळवारी रात्री हायड्रा यंत्राने उचलण्यात आली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Illegal handcart with chief ministers picture removed action taken by kalyan dombivli municipality mrj

First published on: 06-12-2023 at 16:43 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×