डोंबिवली – येथील पूर्व भागातील एका बांधकाम कंपनीच्या प्रकल्पावर एका कामगार पर्यवेक्षकाने एका मजुराला सुरक्षिततेची कोणतीही साधने दिली नाहीत. एका कामगाराला सिमेंट वाहू मिक्सर यंत्राला घातक रसायन हातात घेऊन ते घासण्यास सांगितले. या रसायनामुळे या कामगाराला गंभीर दुखापत झाली आहे. रविवारी सकाळी नवनीतनगर येथे इरा होम साईटवर हा प्रकार घडला आहे.

कामगार पर्यवेक्षक मंगेश शाहू आणि इतरांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला आहे, अशी तक्रार मजूर जोगिंदर लालकृष्ण गौर (२१) यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात केली आहे. पोलिसांनी सांगितले, जोगिंदर गौर हे नवनीतनगर येथील ईरा होम गृह प्रकल्पाच्या ठिकाणी मजूर म्हणून काम करतात. या ठिकाणी कोणी कुशल कामगार नसल्याने आरोपी मंगेश शाहू यांनी जोगिंदर यांना सिमेंट वाहू मिक्सरला घातक रसायन घासण्यास सांगितले. हे काम आपणास जमणार नाही हे माहिती असूनही शाहू यांनी ते काम जोगिंदरला करण्यास सांगितले. घातक रसायन हातात घ्यावे लागणार असल्याने शाहू यांनी जोगिंदर यांना हातमोजे, शिरस्त्राण सारखी सुरक्षेची सर्व साधने त्यांना देणे आवश्यक होते. तसेही काहीही न करता शाहू यांच्या सुचनेवरून जोगिंदर यांनी मिक्सर यंत्राला घातक रसायन हाताने लावण्याचे काम केले. या रसायनामुळे जोगिंदर यांच्या हाताला आणि अन्यत्र गंभीर इजा झाल्या. कामगार पर्यवेक्षकाच्या चुकीमुळे हा प्रकार घडला असल्याने जोगिंदर यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

हेही वाचा – राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा, दोन दिवसांपासून भारनियमन नाही

हेही वाचा – विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा अधिकार…; वाचा, कुलपती कोणावर बरसले?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत नवीन बांधकामांच्या ठिकाणी कामगार नियंत्रकांकडून मजुरांना शिरस्त्राण, गमबुट, हातमोजे अशी कोणतीही साधने देण्यात येत नसल्याच्या तक्रारी आहेत.