लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : इन्स्टाग्रामवर अश्लिल पद्धतीने का चिडविले म्हणून म्हणून जाब विचारणाऱ्या एका तरूणाला कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली भागातील तरूणांच्या एका टोळक्याने रविवारी बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत तरूणाच्या नाकाच्या हाडाला गंभीर दुखापत झाली आहे.

Kissu Tiwari Arrested
२२ हत्या करणारा किस्सू तिवारी साधूच्या वेशात रामलल्लाच्या दर्शनाला गेला, पोलिसांनी केली अटक, नेमकं घडलं काय?
Congress Leader P N Patil
काँग्रेस आमदार पी. एन. पाटील यांचं निधन, निष्ठावान शिलेदार काळाच्या पडद्याआड
hazaribagh sinha family haunts bjp loksabha
भाजपाला हजारीबागच्या ‘या’ कुटुंबाची भीती? कारण काय?
Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
Police Commissioner Amitesh Kumar porsche car crash
Pune Car Crash : अल्पवयीन नव्हे, आरोपीवर प्रौढ म्हणून खटला चालवणार? आयुक्तांनी सांगितलं पोलिसांचं पुढचं नियोजन
Loksatta editorial Drought situation in Maharashtra Farmer suicide
अग्रलेख: सतराशे लुगडी; तरी..
Narendra Modi
‘खान मार्केट गँगला न्यायालयाची चपराक’, तृणमूलच्या काळातील ओबीसी दर्जा रद्द झाल्यानंतर मोदींची टीका
Opposing the bail, the prosecution stated that the accused “constantly harassed the victim… through WhatsApp mode, by stalking and by calling the victim at any time with vulgar conversation”.
अल्पवयीन मुलीच्या छेडछाड प्रकरणी तरुणाला जामीन, ‘चांगल्या कुटुंबातला’ मुलगा असल्याने कोर्टाचा निर्णय

किरकोळ विषयातून मुलाला एवढी मारहाण केल्याने मुलाच्या आईने खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पियुष मनोज झोपे असे गंभीर जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. तो कल्याण पश्चिमेतील मल्हार संकुल भागात राहतो. रविवारी संध्याकाळी वसंत व्हॅली येथील नारायण शाळेसमोर हा मारहाणीचा प्रकार घडला आहे. मुलाची आई ज्योती झोपे यांनी याप्रकरणी तक्रार केली आहे.

आणखी वाचा-“राज ठाकरे ज्या उमेदवाराच्या प्रचाराला जातात…”; प्रचारसभांवरून वैभव नाईकांची खोचक टीका!

विजय पुरोहित (रा. चिखलेबाग), आदित्य रमाणी, अंकेश मिश्रा, ईशांत जाधव (रा. मंगला व्हॅली), आप्पा अशी आरोपी तरूणांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले, तक्रारदार ज्योती झोपे यांच्या मुलाला आरोपी तरूणांनी इन्स्टाग्रामवर पियुषला अश्लिल पध्दतीने चिडवले होते. त्याचा राग पियुषला आला होता. आपण संबधित तरूणांना काहीही केले नसताना आपणास का चिडवले जाते म्हणून पियुष रविवारी संध्याकाळी वसंत व्हॅली भागात संबंधित तरूमांना जाब विचारण्यासाठी गेला होता. यावेळी पियुष आणि इतर तरूण यांच्यात भांडण झाले. आरोपी तरूणांनी आपल्या इतर मित्रांना घटनास्थळी बोलावून पियुषला एकत्रितपणे ठोशाबुक्क्याने शिवीगाळ करत मारहाण केली. या मारहाणीत पियुष गंभीर जखमी झाला आहे.

कल्याण, डोंबिवलीत गेल्या काही महिन्यांपासून तरुणांची टोळकी किरकोळ कारणांवरून पादचारी, दुचाकी स्वार यांना बेदम मारहाण करत असल्याच्या घटना वाढल्या आहेत.