कुंभारगाव पक्षिनिरीक्षण
उजनी धरणाकाठच्या कुंभारगावला महाराष्ट्रातील भरतपूर समजले जाते. रोहित, विविध जातींची बदके, पाणकावळे, सीगल्स, चित्रबलाक असे शेकडो प्रजातींचे पक्षी इथे दिसतात. हिरवाई संस्थेतर्फे ५-६ एप्रिल रोजी या कुंभारगाव पक्षिनिरीक्षण सहलीचे आयोजन केले आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी ९६१९७५२१११ या क्रमांकावर संपर्क साधावा.

राजमाची पदभ्रमण
‘एसपीआर’तर्फे येत्या २९ मार्च रोजी लोणावळय़ाजवळील राजमाची येथे रात्रीच्या पदभ्रमण मोहिमेचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी शिल्पा (९९२०३६०३३६) यांच्याशी संपर्क साधावा.

पन्हाळगड, विशाळगड मोहीम
‘आव्हान’ संस्थेतर्फे येत्या १३ व १४ एप्रिल रोजी पन्हाळगड, विशाळगड, पावनखिंड पदभ्रमण मोहिमेचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी ९८३३३४४५१० या क्रमांकावर संपर्क साधावा.

रोहिडय़ावर वृक्षारोपण
शिवजयंतीनिमित्त पुण्यातील ‘हरित सेने’तर्फे रोहिडा किल्ल्यावर नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले. या संस्थेचे हरेश पैठणकर आणि इम्तियाज शेख यांनी या उपक्रमाचे नियोजन केले होते.