महाराष्ट्र हा दुर्गाचा देश. या प्रदेशाएवढे दुर्ग अन्यत्र कुठेही नाहीत. या दुर्गाच्या स्थापत्यातही कमालीचे वैविध्य आहे. भुईकोट, गिरिदुर्ग, जलदुर्ग, वनदुर्ग; या दुर्गाचे बांधकाम, तट-बुरुज, दरवाजे, माची, बालेकिल्ला, धान्य-दारुगोळय़ाची कोठारे, तळी-टाकी-विहीर, गुहा-लेणी-मंदिरे, विविध शिल्प-देवता, शिलालेख, स्तंभ अशा अनेक अंगांनी हे किल्ले सजलेले आहेत. आमच्या दुर्गाच्या याच अंगा-उपांगांचा वेध घेण्यासाठी भारतीय इतिहास संकलन समितीतर्फे आणि संजीवन नॉलेज सिटीच्या सहकार्याने येत्या १७, १८ जानेवारी रोजी पन्हाळा किल्ल्यावर ‘दुर्ग स्थापत्य परिषदे’चे आयोजन केले आहे. या परिषदेमध्ये महाराष्ट्रातील मान्यवर दुर्ग अभ्यासक दुर्ग स्थापत्यातील एकेका भागावर आपआपले शोधनिबंध सादर करणार आहेत. माहिती, अभ्यास, संशोधन मूल्यांवर आधारित या निबंध वाचनानंतर त्या-त्या विषयावर अभ्यासकांबरोबर चर्चा होणार आहे. या परिषदेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी डॉ. अमर आडके (९८९०६६३६०४) किंवा डॉ. आनंद दामले (९८६०५६५१९०) यांच्याशी संपर्क साधावा.
संग्रहित लेख, दिनांक 8th Jan 2015 रोजी प्रकाशित
उपक्रम : दुर्गस्थापत्य परिषद
महाराष्ट्र हा दुर्गाचा देश. या प्रदेशाएवढे दुर्ग अन्यत्र कुठेही नाहीत. या दुर्गाच्या स्थापत्यातही कमालीचे वैविध्य आहे.

First published on: 08-01-2015 at 01:02 IST
मराठीतील सर्व Trek इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Conference based on research values