वर्षां ऋुतू सुरू झाला, की गिरिशिखरांबरोबरच गडकोटांवरच्या वास्तूंमध्येही हिरवाईचे चैतन्य संचारते. छत्रपती शिवरायांची राजधानी असलेल्या रायगडावरील हा स्तंभही हिरवाईच्या याच उत्सवात न्हाऊन निघाला आहे. रायगडावर दोन द्वादशकोनी तर एक अष्टकोनी स्तंभ आहेत. हे स्तंभ म्हणजे रायगडाच्या सौंदर्य गुढय़ाच म्हणाव्यात. छायाचित्रात दिसणारा हा द्वादशकोनी स्तंभ तीन मजल्यांचा. याच्या बाराही बाजूंना एकेक सज्जा. त्या भोवती नक्षीकाम केलेल्या कमानी. वर्षां ऋुतू सुरू झाला, की या नक्षीभोवती त्या चिऱ्यांमधून हिरवाईच्या ओळी उमलतात. भाद्रपदापर्यंत त्यावर सोनकीची फुले फुलतात. सारा स्तंभच चिरतरुण होऊन जातो. श्रावणओल्या ऊनपावसाच्या या खेळात सारे दृश्यच देखणे होऊन जाते.
संग्रहित लेख, दिनांक 24th Sep 2015 रोजी प्रकाशित
रायगडाची गुढी
वर्षां ऋुतू सुरू झाला, की गिरिशिखरांबरोबरच गडकोटांवरच्या वास्तूंमध्येही हिरवाईचे चैतन्य संचारते.
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद

First published on: 24-09-2015 at 00:05 IST
मराठीतील सर्व Trek इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pillar of raigad