ट्रेक डायरी: बांधवगड दर्शन

धकाधकीच्या, स्पर्धेच्या या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता साऱ्यांनाच आवश्यक झाले आहेत.

धकाधकीच्या, स्पर्धेच्या या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता साऱ्यांनाच आवश्यक झाले आहेत. दोन दिवस कुठेतरी जावे आणि भटकून रिफ्रेश व्हावे ही आता अनेकांची दैनंदिनी बनली आहे. यातूनच मग सहल, ट्रीप, टूर, आऊटिंग, विकएन्डपासून ते ट्रेकिंग, गिर्यारोहणापर्यंत अशा वेगवेगळय़ा नावांखाली भटकण्याची एक मोठी संस्कृती समाजात रुजू लागली आहे. भटकंतीच्या या वाटा, त्यावरचे सौंदर्यानुभव, गमतीजमती आणि थ्रिल घेऊन ‘ट्रेक इट’ दर बुधवारी आपल्याला भेटते! ही पुरवणी आपल्याला कशी वाटते हे आम्हाला जरूर कळवा. तसेच नवीन स्थळांची माहिती, ट्रेकचा अनुभव, हटके छायाचित्र, आपल्या अनुभवांवर आधारित संक्षिप्त स्वरुपातील ब्लॉग लिहून आपण सहभागी होऊ शकता. संपर्कासाठी – ‘ट्रेक-इट’साठी , लोकसत्ता, ‘एक्स्प्रेस हाऊस’, प्लॉट क्र. १२०५/२/६, शिरोळे पथ, शिवाजीनगर, पुणे – ४११००५. Email – abhijit.belhekar@expressindia.com
बांधवगड दर्शन

‘निसर्ग टूर्स’तर्फे येत्या २१ ते २५ एप्रिल दरम्यान मध्य प्रदेशमधील बांधवगड राष्ट्रीय उद्यान सफारीचे आयोजन करण्यात आले आहे. बांधवगड हे ऐतिहासिक काळापासून राजघराण्याचे राखलेले जंगल आहे. परंतु या राजेशाहीच्या काळातच झालेल्या मोठय़ा शिकारीनंतर महाराज मरतडसिंह यांनी शिकारीवर बंदी घातली. या जंगलाचे एका राखीव वनामध्ये रूपांतर केले. वन्यप्राण्यांना संरक्षण दिले, त्यांच्यासाठी जागोजागी लहानमोठे बांध घातले. हे संपन्न जंगल पुढे १९७५ साली व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर झाले. एकूण ४४८ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या या जंगलात वाघांशिवाय बिबटे, जंगली कुत्री, नीलगाय, चौशिंगा, भेकर, चिंकारा, रानडुक्कर, सांबर, चितळ, हनुमान लंगूर अशा अनेक प्राण्यांचे वास्तव्य आहे. अडीचशेहून अधिक जातींच्या पक्ष्यांचीही इथे नोंद झाली आहे. या सहलीमध्ये जबलपूरमधील भेडा घाटलाही भेट दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधावा.

मुंबईतील किल्ले
महाराष्ट्रातील साडेतीनशे दुर्गाविषयी आपण साऱ्यांनीच ऐकलेले आहे. मात्र मुंबईत आपल्या उशापायथ्याशी असलेल्या मुंबईतल्या किल्ल्यांविषयी आपल्याला किती माहिती आहे? मुंबईतील हे दुर्गवैभव जाणून घेण्यासाठीच एका मोहिमेचे आयोजन केले आहे. होरायझन संस्थेतर्फे २८ डिसेंबर, ४ जानेवारी मुंबईतील शिव, धारावी, शिवडी, वरळी, माहीम आणि वांद्रे या प्रमुख किल्ल्यांच्या दर्शनाची संधी उपलब्ध केली आहे. या सफरीमध्ये या दुर्गाचे दर्शन, त्यांची माहिती, इतिहास आणि दुर्ग संकल्पना यांचा परिचय करून दिला जाईल. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक असून त्यासाठी शंकर राऊत (९९६९६३४३४४) किंवा निलाक्षी पाटील (९८१९१०६३४७) यांच्याशी संपर्क साधावा.

‘फोर्ट मॅरेथॉन’
पुण्यातील सागरमाथा गिर्यारोहण संस्थेतर्फे दिवंगत गिर्यारोहक रमेश गुळवे यांच्या स्मरणार्थ येत्या २८ डिसेंबर रोजी लोहगड-विसापूरवर ‘फोर्ट मॅरेथॉन’चे आयोजन केले आहे. लोहगड किल्ल्याच्या पायथ्यापासून २८ रोजी सकाळी सात वाजता या स्पर्धेस सुरुवात होणार आहे. खुला गट आणि हौशी अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेची नोंदणी आणि अधिक माहितीसाठी संजय गवळी (८०८७६२८६५६) किंवा सुधीर निगडे (८०८७४२७५२३) यांच्याशी संपर्क साधावा.

रायगड किल्ले सफर
रायगड संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने २६ ते २८ डिसेंबर दरम्यान किल्ले रायगड दर्शन मोहिमेचे आयोजन केले आहे. या मोहिमेत दुर्ग अभ्यासकांच्या उपस्थितीत रायगडाची माहिती आणि दर्शन घडणार आहे. अधिक माहितीसाठी राजेंद्र (९७७३०५२२००) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कास – महाबळेश्वर भ्रमण
‘द लार्क’ संस्थेतर्फे सातारा जिल्ह्य़ातील कास ते महाबळेश्वर या निसर्ग भटकंतीचे आयोजन केले आहे. ऐतिहासिक काळातील या राजमार्गाने होणाऱ्या या भटकंती दरम्यान कोयनेचा जलाशय, जंगल, निसर्गाचे दर्शन होणार आहे. यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी सागर गायकवाड (९८८१३४६२४३) यांच्याशी संपर्क साधावा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Trek diary