22 July 2019

News Flash

चक्क अंतराळात जन्माला येणार एक ‘देश’, नागरिकत्व मिळवण्यासाठी ११ हजार भारतीयांनी केले अर्ज

या देशाचे नागरिकत्व मिळवण्यासाठी आपल्यापैकी कोणीही अर्ज करु शकतो.

या देशाची रुपरेषा अद्याप निश्चित झालेली नाही.

आकाशात चमचणाऱ्या ताऱ्यांमध्ये राहायला मिळाले तर? स्वप्नवत असणारी ही गोष्ट वास्तवात आली तर? होय! आता ताऱ्यांमध्ये राहाण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार आहे. कारण, तुम्ही पाहिलेले स्वप्न वास्तवात आणण्याची तयारी काही वैज्ञानिकांनी सुरु केली आहे. या मंडळींनी अंतराळात चक्क एक देश वसवण्याचा संकल्प केला आहे. या देशाचे नाव अॅजगार्डिया असे ठेवण्यात येणार आहे. ऑस्ट्रिया देशातील व्हिएना शहरात एरोस्पेस इंटरनॅशनल रिसर्च सेंटर ही खासगी कंपनी या प्रकल्पाचे संचलन करत आहे. या कंपनीची स्थापना रशियातील संशोधक आणि उद्योगपती डॉ. इगर अशरबेली यांनी केली आहे.

या देशाचे नागरिकत्व मिळवण्यासाठी आपल्यापैकी कोणीही अर्ज करु शकतो. आतापर्यंत ५० हजार लोकांनी Asgardia.com या संकेतस्थळावरुन या देशाचे नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज केले आहेत. भारतीय लोक देखिल अॅजगार्डियाच्या नागरिकत्वासाठी प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत ११ हजार ३५७ भारतीयांनी अर्ज केले आहेत. संशोधक लेना द विन यांच्या मते अॅजगार्डियाचे नागरिकत्व देण्यापूर्वी लोकांच्या अर्जांची योग्य छाननी केली जाईल आणि नंतर त्यांना पासपोर्टही दिला जाईल.

या देशाची रुपरेषा अद्याप निश्चित झालेली नाही. या देशाचा पहिला उपग्रह पुढील वर्षी प्रक्षेपित केला जाणारा आहे तसेच पृथ्वीच्या कक्षेतील ही खरीखुरी नो मॅन्स लँड असेल असे अॅजगार्डियाच्या वेबसाईटवर म्हटले आहे.  या देशाला संयुक्त राष्ट्र मंजुरी देतील अशीही त्यांना आशा आहे. या देशाचं राष्ट्रगीत आणि ध्वज ठरवण्यासाठी स्पर्धाही घेतली जात आहे.  लंडन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस पॉलिसी अँड लॉ या संस्थेचे संचालक प्रा. सेड मॉस्टेशर या प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय कायद्यांनी कशी परवानगी मिळेल यावर शंका उपस्थित केली.

 

First Published on March 10, 2019 3:19 am

Web Title: asgardia the space nation