धोनी संपला, धोनी आता पूर्वीसारखा खेळत नाही, सामना संपवण्याची कला धोनीकडे आता राहिली नाही अशाप्रकारे सातत्याने टीका करणा-यांना महेंद्रसिंग धोनीने बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आपल्या खेळीतून चांगलीच चपराक लगावली.

क्रिकेटच्या मैदानावर महेंद्रसिंग धोनी पुन्हा आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करताना दिसतोय. आयपीएल २०१८ मध्ये धोनीच्या बॅटीतून खो-याने धावा निघतायेत. बुधवारी बंगळुरूविरूद्ध धोनीने ३४ चेंडूंमध्ये नाबाद ७० धावांची धमाकेदार खेळी करुन चेन्नईला विजय मिळवून दिला. धोनीने ७ उत्तुंग षटकार आणि एक चौकार ठोकला. विशेष म्हणजे ‘धोनी स्टाइल’मध्ये म्हणजे षटकार मारुन संघाला विजय मिळवून दिल्यामुळे धोनीच्या चाहत्यांमध्ये नवा उत्साह संचारल्याचे पाहायला मिळत आहे. बंगळुरुविरोधातील सामना जिंकताच सोशल मीडियावर धोनीच्या चाहत्यांनी त्याच्यावर टीका करणा-यांवर एकच हल्ला चढवला असल्याचं चित्रं आहे. एकाहून एक भन्नाट ट्विट करुन धोनीच्या चाहत्यांनी त्याच्या टीकाकारांना मौन व्रत धारण करण्यास भाग पाडलंय. ‘धोनी केवळ मॅच संपवत नाही तर तो टीकाकारांनाही संपवतो’ अशाप्रकारचे एकाहून एक बोचरे ट्विट धोनी समर्थकांकडून केले जात आहेत.

निदहास चषकाच्या अंतिम सामन्यात दिनेश कार्तिकने अखेरच्या चेंडूवर षटकार मारुन विजय मिळवून दिल्यानंतर धोनीने आता लवकरच निवृत्ती घ्यायला हवी असा फुकटचा सल्ला अनेकांकडून दिला जात होता आणि धोनीने निवृत्ती घेण्याची मागणी जोर धरत होती त्यामुळे धोनीचे चाहते संतप्त होते.

एक नजर धोनीच्या चाहत्यांच्या ट्विट्सवर –