News Flash

Viral Video : ‘डान्सिंग अंकल’चा मिथुन चक्रवर्तीच्या अंदाजातील अफलातून परफॉर्मन्स

गोविंदाने तर डान्सिंग अंकल आपल्या स्टेप्स अतिशय चांगल्या पद्धतीने करत असल्याचे म्हटत त्यांचे कौतुक केले होते.

डान्सिंग अंकल म्हणून ओळख असलेल्या संजीव श्रीवास्ताव यांचा नवा व्हिडियो नुकताच समोर आला आहे. मिथुन चक्रवर्ती यांच्या ज्युली, ज्युली….या गाण्यावर अंकलची पाऊले थिरकली असून हा व्हि़डियो काही वेळात हजारो जणांनी पाहिला आहे. मिथुन आणि गोविंदा हे आपले डान्समधील आयडॉल असल्याचे डान्सिंग अंकल नेहमीच सांगतात. आता पोस्ट करण्यात आलेला व्हिडियो साधारण अडिच मिनिटांचा आहे. संजीव  श्रीवास्तव हे ४६ वर्षांचे असून ते मध्यप्रदेशमध्ये इलेक्ट्रॉनिक विषयाचे प्राध्यापक म्हणून काम करतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी कहो ना प्यार है मधील हृतिक रोशन याच्या स्टेप्स करत नेटीझन्सची वाहवा मिळवली होती.

संजीव श्रीवास्तव यांनी त्यांचा पहिला व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून सलमान खान, माधुरी दीक्षित आणि गोविंदा यांची भेट घेतली आहे. आपल्या या डान्सिंगमुळे श्रीवास्तव विदिशा महापालिकेचे ब्रँड अँबेसेडर म्हणून निवडले गेले आहेत. याआधी त्यांचे अनेक व्हिडियो व्हायरल झाले असून त्यांना नोटीझन्सकडून मोठी पसंती मिळाली होती. त्यांच्या डान्सच्या या कलेमुळे अर्जुन कपूर, रविना टंडन, अनुष्का शर्मा, दिया मिर्झा, दिव्या दत्ता आणि संध्या मेनन यांच्याकडूनही कौतुक झाले आहे. गोविंदाने तर डान्सिंग अंकल आपल्या स्टेप्स अतिशय चांगल्या पद्धतीने करत असल्याचे म्हटत त्यांचे कौतुक केले होते. तसेच त्यांचा डान्स पाहणे ही एकप्रकारची ट्रीट असते असेही तो म्हणाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2018 12:28 pm

Web Title: dancing uncle new viral video he performs mithun chakraborty dance julie
Next Stories
1 Viral Video : मशिद नाही तर गुरुद्वारामध्ये नमाज पठण
2 टायटॅनिकमधील प्रवाशाच्या ‘त्या’ पॉकेट वॉचवर तब्बल ४० लाखांची बोली
3 Social Viral : या फोटोतील साप शोधून तर दाखवा…
Just Now!
X