‘पद्मावती’ या चित्रपटावरून सध्या वाद सुरू आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातली दोन गाणी प्रदर्शित करण्यात आली. त्यातलं ‘घुमर’ हे गाणं तर खूपच गाजलं. यात दीपिकानं ज्या प्रकारे नृत्य केलं त्यावरून तिच्यावर सगळ्यांकडूनच कौतुकाचा वर्षाव होत आहे. खुद्द चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भंन्साळी यांनी तिच्या मेहनतीवर खूश होऊन तिला एक खास भेटवस्तू देऊ केली आहे. हे गाणं दोन हौसी डान्सरमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

या डान्सर्सनी इतका अफलातून डान्स केला आहे की, दीपिकाने हा डान्स पाहिला तर तीही या दोघांच्या कौशल्याचं कौतुक केल्यावाचून राहणार नाही हे नक्की. ‘डान्स अँड इन्सपायर’ या फेसबुक पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून त्याला तुफान प्रसिद्धी लाभली आहे. आतापर्यंत या व्हिडिओला २२ हजारांहून अधिक लाईक्स आले असून सगळेच त्यांचं कौतुक करत आहेत.