एका फुत्काराने अनेकांचा थरकाप उडवणाऱ्या अशा नागाशी चक्क एका व्यक्तीने गप्पा मारल्या आहेत. या व्यक्तीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये मद्यधुंद नशेत असणारा एक व्यक्ती नागाच्या वाटेत अडवा येतो आणि चक्क त्याच्याशी गप्पा मारायला सुरुवात करतो. हा व्हिडीओ राजस्थानमधील दौसा येथील आहे. नागाचा रस्ता अडवून खेळ करणाऱ्या व्यक्तीचा हा व्हिडिओ अंगावर काटा आणणारा आहे.
व्हिडीओमध्ये नशेत धुंद असणारा व्यक्ती नागासोबत खेळताना तसेच त्याच्या सोबत कसरती करताना दिसतो. इतकच नव्हे तर तो नागासोबत नागीण डान्स देखील करताना दिसत आहे. हा नाग त्या मद्यधुंद व्यक्तीच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्याचे प्रयत्न अपयशी ठरतात. संपूर्ण गाव या व्यक्ती आणि सापामधील खेळ पाहण्यासाठी तेथे जमा होतो. पण हा जीवघेणा खेळ थांबवण्याची मात्र कोणी हिंमत करत नसल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
नशा शराब में होता तो नाचती बोतल… pic.twitter.com/9Vp9wk4eaZ
— anuragamitabh انوراگ امیتابھ अनुरागअमिताभ (@anuragamitabh) January 4, 2020
एक वेळ अशी येते की तो साप मद्यधुंद व्यक्तीच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करतो. पण ती व्यक्ती पळत जाऊन त्याला पुन्हा पकडते आणि त्या दोघांमधील खेळ पुन्हा सुरु होते. बराच वेळ हा खेळ सुरु राहतो. अखेर दोन तरुण हिंमत करुन त्या मद्यधुंद व्यक्तीच्या तावडीतून सापाची सुटका करतात. पण या संपूर्ण खेळात नशेत असलेल्या व्यक्तीला सापाने अनेक ठिकाणी दंश केला. सापापासून सुटका करुन या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखलल करण्यात आले आहे. सध्या त्या व्यक्तीच्या प्रकृतीसंबंधी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र ती व्यक्ती आणि नाग यांच्यातील खेळाचा व्हिडीओ मात्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.