News Flash

‘या’ कारणामुळे फ्लशला असतात दोन बटणं!

अत्यंत विचार करुन या बटणांची रचना करण्यात आली आहे

साधरणपणे २०-३० वर्षांपूर्वीपर्यंत मध्यमवर्गातील बहुतांश घरांमध्ये जुन्या पद्धतीचीच शौचालये होते. मात्र काळ बदलत गेला आणि शौचालयाचे स्वरुपदेखील बदलले. पारंपारिक शौचालयांची जागा कमोडने घेतली. या पद्धतीमध्ये देखील वेगवेगळ्या आकाराचे आणि प्रकारचे कमोड आहेत. या कमोडमध्ये पाणी जाण्यासाठी एक फ्लश देण्यात आलेला असतो. जो कमोडच्या वरच्या बाजूस असतो. विशेष म्हणजे या फ्लशला दोन बटणं असतात.त्यात एक लहान आणि एक मोठं अशी दोन बटणं असतात. मात्र या दोघांचा नेमका वापर कधी करावा हे फार कमी जणांना माहित असतं.

दोन बटणं असलेल्या या फ्लशला Dual Flush असं म्हणतात. बहुधा हे बटण मॉर्डन टॉयलेट्समध्येच पाहायला मिळतं. ही दोन्ही बटणं Exit Valve ला जोडलेली असतात. या पैकी मोठं बोटणं प्रेस केल्यानंतर जवळपास ७ ते ९ लीटर पाणी येतं. तर लहान बटण प्रेस केल्यानंतर ३ ते ४.५ लीटर पाणी येतं. पाण्याचा अपव्यय टाळावा आणि गरजेपुरतचं पाणी वापरता यावं यासाठी या बटणांची सोय केली असते.

जर सिंगल फ्लशच्या जागी डबल फ्लश बसविण्यात आला तर वर्षाकाठी जवळपास २० हजार लीटर पाणी वाचवता येऊ शकतं. डबल फ्लश करण्याची ही योजना अमेरिकेतील इंडस्ट्रीयल डिझायनर व्हिक्टर पापानेक यांनी १९७६ मध्ये सुचली होती. त्यांनी त्यांच्या ‘Design For The Real World’ या पुस्तकात त्याचा उल्लेख केला होता. तसंच ही सिस्टीम प्रथम ऑस्ट्रेलियामध्ये वापरण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2019 12:40 pm

Web Title: dual flush toilet here why toilet flush has one large and one small button ssj 93
Next Stories
1 Video: भारतीय लष्कराच्या कॅन्टीनमध्ये हत्ती शिरला आणि…
2 संसदेत चर्चेदरम्यान खासदारानं केलं गर्लफ्रेंडला प्रपोज; व्हिडिओ व्हायरल
3 UPSC IAS interview question: उमेदवाराला विचारलं तुम्ही इतके बारीक का?
Just Now!
X