01 October 2020

News Flash

Viral Video: दुबईच्या राजपुत्राची माणुसकी! ….म्हणून मर्सिडिज SUV वापरणं केलं बंद

राजपुत्राने दाखवलेल्या माणुसकीचं सर्वत्र कौतुक...

(व्हिडिओवरुन घेतलेला स्क्रीनशॉट)

दुबईचे क्राऊन प्रिन्स, शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांच्यावर सध्या सोशल मीडियामध्ये कौतुकाचा वर्षाव होत आहे. कारण, त्यांनी चक्क एका पक्षाच्या घरट्यासाठी आपली लग्जरी मर्सिडीज एसयूव्ही वापरणं बंद केलं आहे.

क्राऊन प्रिन्स मकतूम यांना त्यांच्या मर्सिडीज एसयूव्हीच्या बोनेटवर एका पक्षाने घरटं बनवल्याचं दिसलं. त्यामुळे गाडीचा वापर करण्यासाठी त्यांना घरटं हटवावं गरजेचं होतं. त्या घरट्यात पक्षाने अंडे दिले होते. पण, मकतूम यांनी घरटं न हटवता थेट ती एसयूव्हीच न वापरण्याचा निर्णय घेतला आणि ती गाडी एका बाजूला उभी केली. याशिवाय गाडीच्या जवळपास कोणी जाणार नाही याचीही खबरदारी त्यांनी घेतली. जोपर्यंत अंड्यांमधून पिल्लं बाहेर पडत नाहीत तोपर्यंत गाडी वापरणार नाही असं त्यांनी गेल्या आठवड्यात इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर आता त्यांनी अजून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये अंड्यांमधून पिल्लं बाहेर आल्याचं दिसत असून पक्षी आपल्या पिल्लांची काळजी घेताना दिसत आहे.

पाहा व्हिडिओ –

 

View this post on Instagram

 

A post shared by Fazza (@faz3) on


‘कधीकधी जीवनातल्या छोट्या गोष्टीही खूप मोठ्या ठरतात’, अशा कॅप्शनसह क्राऊन प्रिन्सने शेअर केलेला हा व्हिडिओ 24 तासांमध्येच 1 दशलक्षहून जास्त जणांनी पाहिला आहे. एका पक्षाच्या घरट्यासाठी राजपुत्राने दाखवलेल्या माणुसकीचं नेटकरी कौतुक करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2020 8:24 am

Web Title: dubai crown prince keeps suv aside after spotting a nest of bird on it shares video of new chicks sas 89
Next Stories
1 Viral Video : तिने PPE कीट काढलं अन्… ; हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही करोनायोद्ध्यांच्या अभिमान वाटेल
2 पबजीचे व्यसन लागल्याने १६ वर्षीय मुलाचा मृत्यू; गेमच्या नादात सोडलं होतं अन्न, पाणी
3 महात्मा गांधींच्या चष्म्यांचा ब्रिटनमध्ये होणार लिलाव; किंमत पाहून व्हाल थक्क!
Just Now!
X