News Flash

अन् त्याने आकाशातील त्या गूढ ताऱ्याला खाली उतरवण्यासाठी पोलिसांना बोलावलं

हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील हसू आवरणं कठीण होईल.

आकाशातील गूढ ताऱ्याला उतरण्यासाठी एका तरूणाने उत्तर प्रदेश पोलिसांना बोलावल्याचा एक मजेशीर घटना घडली आहे. याबाबतचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

सध्या या व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. शिवाय अनेकांना हा व्हिडिओ पाहून हसू आवरणं देखील कठीण होत आहे.

या व्हिडिओमध्ये हा तरूण पोलिसांना आकाशाकडे बोटं दाखवून तारे दाखवत आहे. तो तारा मला त्रास देत आहे. मध्येच एकदा दिसला व नंतर गायब झाला. त्याला खाली उतरवा.. असं कही तो म्हणत आहे.

अनेकांनी यावर मजेशीर कमेंट देखील दिल्या आहेत. एकाने याला देशी ठर्रा व गांजाला प्रमोट केलं असल्याचं देखील म्हटलं असून पंतप्रधान मोदींच्या व्होकल फॉर लोकलच्या संदेशाचा संदर्भ देखील जोडला आहे. तर आता पोलिसांना या कामासाठी देखील बोलवलं जाऊ लागलं, असल्याचं एकाने म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2020 9:47 pm

Web Title: finally he called the police to bring down the mysterious star in the sky msr 87
Next Stories
1 ‘योग’ होता हत्तीवरुन पडण्याचा! रामदेवबाबांचा व्हिडीओ व्हायरल
2 पक्षी की बोकड? तुम्हाला काय दिसतंय?; शबाना आझमींचं ट्विट बघाच
3 Love Jihad प्रसाराचा टाटा ब्रँडवर आरोप, जाहिरात घेतली मागे
Just Now!
X