News Flash

Viral Video: …अन् काही क्षणात चार मजल्याची इमारत कालव्यामध्ये पडली

वरचे दोन मजले मुख्य बांधकामापासून झाले वेगळे

पश्चिम बंगालमधील मिदनापूरमध्ये शनिवारी एक धक्कादायक प्रकार घडला. येथे पाटबंधाऱ्याच्या बाजूला असणारी एक चार मजल्याचं बांधकाम कालव्यामध्ये पडलं. इमारतवजा घर असणारं हे बांधकाम कालव्याचं काम सुरु असतानाच कोळलं. ही घटना कॅमेरामध्ये कैद झाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. या दुर्घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये चार मजल्यांचे विटांचे बांधकाम असलेले घर कालव्याच्या दिशेने हळूहळू झुकताना दिसते आणि पुढल्या क्षणी पूर्णपणे कोलमडून बंधाऱ्यामध्ये पडते. हे घर पडताना वरील दोन मजले मुख्य घरापासून पूर्णपणे वेगळे होतानाही दिसतात.

इमारतींचा पायाजवळ कालव्याचे काम सुरु करण्यात आल्याने घर पडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. मात्र घराच्या भिंती हलत असल्याचे लक्षात आल्यानंतर तातडीने घरं रिकाम करण्यात आल्याने यामध्ये कोणीही जखमी झालं नाही. मिदनापूरमधील गोमराइ कालव्याचे काम सुरु आहे. याच कालव्याचे खोदकाम सुरु असतानाच हा अपघात घडला आहे. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार खोदकाम करताना या घरांच्या पायथ्याजवळील माती काढण्यात आल्याने घर कालव्याच्या बाजूला कललं आणि पडलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2020 2:26 pm

Web Title: four storey building collapses in west bengal disturbing visuals caught on camera scsg 91
Next Stories
1 खगोलशास्त्रज्ञ म्हणतात, “आपल्याच आकाशगंगेत एलियन्सच्या ३० वसाहती असण्याची शक्यता”
2 डिप्रेशन म्हणजे काय?, सुशांतच्या आत्महत्येनंतर Google Search वाढला; करोनालाही टाकलं मागे
3 बापरे… तो चक्क मगरीला कडेवर घेऊन आइस्क्रीम पार्लरमध्ये शिरला
Just Now!
X