नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लोकसभा निवडणुकीत भाजपाने गेल्या निवडणुकीचे आकडे मागे टाकून अभूतपूर्व यश मिळवलं. मोदीवर देशातील जनतेचं किती प्रेम आहे हे निकालावरुन स्पष्टच झालंय. मोदी यांचा हा अभूतपूर्व विजय चाहते विविध पद्धतीने साजरा करत आहेत. बिहारमधील एका तरूणानं मोदींच्या विजयानंतर आनंदात चक्क स्वतःच्या छातीवर चाकूने मोदींचं नाव कोरल्याची चर्चा ताजी असतानाच आणखी दोन चाहत्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही चाहत्यांनी मोदी जिंकले म्हणून चक्क दिवसभर रिक्षामधील एकाही प्रवाशाकडून भाडे घेतले नाहीत.

उत्तराखंडमधील हल्द्वानी येथील २४ वर्षीय जमुना प्रसाद आणि मध्य प्रदेशातील राजगढमधील शोभाराम कुशवाह असे दोन्ही रिक्षा चालकांची नावं आहेत. मोदी यांच्या विजयानंतर दिवसभर यांनी आपल्या प्रवशांकडून पैसे घेतले नाहीत. दोघेंही स्वत:ला मोदींचे सर्वात मोठे चाहते आणि समर्थक असल्याचे मानतात. त्यामुळे त्यांनी मोदी पुन्हा एकदा पूर्ण बहुमताने सत्तेत आल्यानंतर दिवसभार प्रवाशांना फुकटात फिरवले. २४ तारखेला पहाटे पाच वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत मोफत रिक्षा चालवली. रिक्षावर लावलेल्या मोफतच्या बोर्डाकडे पाहून रस्त्यावरील प्रत्येकजण रिक्षा थांबवत होते.

जमुना प्रसाद गेल्या चार वर्षांपासून रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांची एकादिवसाची कमाई एक हजार रूपये आहे. वर्षाभरापूर्वी जमुना प्रसाद यांचे लग्न झाले आहे. जमुना प्रसाद दररोज सकाळी पाच वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत रिक्षा चालवतात.

शोभाराम यांनी मोदी यांचा विजय आपल्या हटके अंदाजात साजरा केला. त्यांनी ब्यावरा शहरातील लोकांना मोफत प्रवास करण्याची संधी दिली. सोशल मीडियावर या दोन्ही रिक्षा चालकाची चर्चा सुरू आहे.